शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

Sindhudurg: समुद्र खवळला, प्रशासन अलर्ट मोडवर; मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST

ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले

मालवण : किनारपट्टीवर जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मत्स्य आणि बंदर विभागाकडून मच्छिमार तसेच सागरी पर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खराब समुद्री हवामानामुळे सलग चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, वादळी हवामानाचा मासेमारी आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.किनारपट्टीवर शुकशुकाटदिवाळीच्या हंगामात आपल्या सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक किनारपट्टीवर आपली हजेरी लावतात. मात्र, वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग आदी जलक्रीडा प्रकार बंद ठेवावे लागल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. मासेमारी नौकाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. पर्यटक आणि मच्छीमारांमुळमुळे एरव्ही गजबजलेल्या किनारपट्टीवर शुकशुकाट दिसून आला.बंदर विभाग सतर्कबंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदर विभागाची टीम किनारपट्टीवर लक्ष ठेवून आहे. ज्या ज्या ठिकाणी सागरी जलक्रीडा प्रकार चालतात अशा तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, मालवण या किनारपट्टीवर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त चालू केली आहे. हवामान शांत होईपर्यंत समुद्रातील सर्वच जल क्रीडा प्रकार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदर जेटी आणि अन्य सागरी जल पर्यटन चालत असलेल्या किनारपट्टीवर लक्ष ठेवून आहोत. बंदरात १ नंबरचा बावटा लावण्यात आल्या असल्याचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी सांगितले.मत्स्य विभागाकडून खबरदारीचा इशाराप्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त हवामान संदेशानुसार हवामान विभागाने राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याबाबतचा इशारा दिलेला आहे. यामुळे अधिनिस्त नौका मालक व मच्छीमार यांना खबरदारीचा सूचना देण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून, त्याचा वेग ६० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पर्यटक वळले राजकोट किल्यावर......सिंधुदुर्ग किल्ला, आणि सागरी जलक्रीडा पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा राजकोट किल्ल्याकडे वळविला. मंगळवारी सकाळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या ठिकाणी खडकाळ किनाऱ्यावर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचाही पर्यटकांनी आनंद लुटला.

यांत्रिक, यंत्रचलित नौकांनी, तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारे सह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. - सागर कुवेसकर, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Rough Sea, Alert Issued to Fishermen, Tourism Businesses

Web Summary : Sindhudurg coast on alert due to rough seas. Fishermen and tourism operators warned against venturing out. Boat services suspended, impacting businesses. Tourists turn to Rajkot Fort.