शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, सोशल मीडीयावर विशेष लक्ष

By अनंत खं.जाधव | Updated: May 6, 2024 16:17 IST

सावंतवाडीतील निवडणूक केंद्राची पाहणी केली

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीला  2200 पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून एकूण तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी निवडणुकीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षकसौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक काळात कोणतीही घटना घडली नाही. कुडाळ येथे दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या समवेत सावंतवाडीतील निवडणूक केंद्राची पाहणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा केली.यावेळी अग्रवाल म्हणाले, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुरळित होती. नाक्या नाक्यावर गाडी तपासणी करण्यात आली सर्वत्र योग्य पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून तब्बल दोन हजार पोलिस कर्मचारी आले आहेत तसेच 150 अधिकारी तैनात आहेत. त्याशिवाय होमगार्ड वैगरे मिळून तीन हजार पोलिस कर्मचारी हे निवडणूक बंदोबस्तात आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या ही कार्यरत असल्याचेही सांगितले.सोशल मीडीयावर विशेष लक्ष सोशल मीडीयावर टाकण्यात येणाऱ्या काही पोस्ट या वादग्रस्त असतात त्याबाबत तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाते त्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात एक टिम तैनात ठेवण्यात आली असून असे कोणत्याही वादग्रस्त पोस्ट आल्यानंतर त्या तत्काळ काढून टाकण्यात येतात तसेच पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला समज दिली जाते तसेच एकदमच वादग्रस्त असेल तर गुन्हा दाखल करण्यात येतो असेही अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४