शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 18:33 IST

corona virus Sindhudurg-दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा व नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : के. मंजुलक्ष्मीयात्रोत्सव फक्त पुजारी, देवस्थान सदस्यांच्या उपस्थितीत होणार

ओरोस : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा व नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी केवळ देवस्थान कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे या यात्रास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. आपली जबाबदारी समजून आपल्या घरात राहून मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा, असे आवाहन करतानाच यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. या वेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवांचा उत्सव सुरू आहे. त्यात पूर्ण राज्याचे लक्ष असलेली आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली आंगणेवाडीची भराठी देवीची जत्रा ६ फेब्रुवारी रोजी तर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरची यात्रा महाशिवरात्री अर्थात ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. मात्र या दोन्ही जत्रास्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने राज्यात वाढता कोरोनाचा धोका पाहता आंगणेवाडी आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टशी जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठक घेत या यात्रा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार दोन्ही देवस्थान कमिटींनी या यात्रा रद्द करत केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक विधीदेखील काही निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. मात्र, या यात्रास्थळी भाविक व अन्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. यात्रास्थळी जाणारे काही मार्ग सील करण्यात येत आहेत. दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या यात्रास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. आपली जबाबदारी समजून आपल्या घरात राहून मानव सेवा हीच माधव सेवा हा धर्म पाळावा, असे आवाहन केले आहे.तसेच यात्रास्थळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यात्रास्थळी गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झाल्यास ते योग्य नाही यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग