शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:27 IST

Kankavli, muncipaltyCarporation, sindhudurgnews शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकणकवलीतील आग प्रकरणदोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

कणकवली : कणकवली शहरातील बाणे किराणा दुकानाला रविवारी आग लागली . त्यावेळी अग्निशामक बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करून निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे . याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही . याप्रकरणी शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष बंधू हर्णे , आरोग्य सभापती अभिजीत मुसळे , संदीप नलावडे , किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते .समीर नलावडे म्हणाले , रविवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपण जिल्ह्याबाहेर होतो. आगी बाबत माहिती समजताच उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सर्व सूचना दिल्या होत्या. दिलीप बिल्डकॉन या महामार्ग ठेकेदार कंपनीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी मीच बोलावून घेतला होता .

टँकर यायला उशीर झाल्याने वाटेत टँकर थांबवून अग्निशामक बंबा मध्ये कर्मचाऱ्यांनी पाणी भरून घेतले . मात्र, या साऱ्या प्रकारात बंब घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे दुकानदार बाणे यांचे अधिक नुकसान झाले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो . मात्र, त्यानंतर नगरपंचायत बंबामुळेच संबधित आग आटोक्यात आणण्यात आली .या घटनेवेळी कणकवलीतील नागरिक, नगरसेवक यांनी स्वयंस्फूर्तीने जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी नगराध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो . याप्रकरणी सबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून अग्निशामक बंबाच्या व्यवस्थेकडे आपण व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि नगरसेवक जातीनिशी लक्ष देणार आहोत .

या घटनेनंतर अग्निशमन बंबाच्या दैनंदिन कामकाजाची नोंदवही ठेवण्यात आली आहे . त्यामाध्यमातून नियमित डिझेल , पाणी व बंबाचा मेंटेनन्स चेक केला जाईल . त्यामुळे या घटनेत कुणीही विनाकारण राजकारण करू नये . असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.ती चूक अक्षम्य !नगरपंचायतीचा अग्निशामक बंब सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे कणकवलीत लागलेल्या आगीच्यावेळी बंबात पाणी नसणे ही कर्मचाऱ्यांची अक्षम्य चूक आहे. त्यांच्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली आहे. त्याबाबत कारवाई होईलच. पण , याच कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा आग आटोक्यात आणून नागरिकांना दिलासा दिला आहे. हे विसरून चालणार नाही.

अग्निशामक बंबाच्या टाकीची क्षमता सहा हजार लिटर पाणी साठविण्याची आहे. त्या बंबाच्या टाकीला लिकेज असले तरी ते वरच्या बाजूला असून त्यामुळे पाच हजार लिटर पाणी बंबात भरले जाते. ते लिकेज काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :KankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग