शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

त्या ब्युटीपार्लरवर पालिकेकडून कारवाई, विनाकारण फिरणारे चौघे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 6:13 PM

CoronaVirus Sindhudurg : सावंतवाडी शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या वाढतच असून बुधवारी सलग चौथ्या दिवशी शहरामध्ये चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये दोघे शहरातील, तर दोघे ग्रामीण भागातील असल्याचे नगरपरिषदेचे डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ब्युटीपार्लरवर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बुधवारी स्वतः कारवाई करत संबंधीत दुकान पंधरा दिवसांसाठी सील केले.

ठळक मुद्देत्या ब्युटीपार्लरवर पालिकेकडून कारवाई विनाकारण फिरणारे चौघे पॉझिटिव्ह

सावंतवाडी : शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या वाढतच असून बुधवारी सलग चौथ्या दिवशी शहरामध्ये चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये दोघे शहरातील, तर दोघे ग्रामीण भागातील असल्याचे नगरपरिषदेचे डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ब्युटीपार्लरवर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बुधवारी स्वतः कारवाई करत संबंधीत दुकान पंधरा दिवसांसाठी सील केले.शासनाकडून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी अकरापर्यंत खरेदीसाठी मुभा दिली असतानाच शहरामध्ये विनाकारण गर्दी करणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस यंत्रणेकडून यावर उपाय म्हणून रॅपिड टेस्टची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेले चार-पाच दिवस ही मोहीम सकाळच्या सत्रात राबविण्यात येते.मात्र, या मोहिमेमध्ये दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी ६४ लोकांमागे ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दररोज मिळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकप्रकारे भीती व्यक्त केली जात आहे.पालिका प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणेकडून सकाळपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरामध्ये नेहमीपेक्षा सायंकाळच्या सत्रामध्ये काहीसा शुकशुकाट पाहायला मिळाला. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसोशीने चौकशी केली जात होती. मेडिकल वगळता इतर कारणांसाठी फिरणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत होते.कोरोना महामारीमध्ये शासनाने केशकर्तनालय तसेच ब्युटीपार्लर यांना बंदी घातली असतानाच, शहरातील खासकिलवाडा येथे सुरू असलेल्या एका ब्युटीपार्लरवर, त्याठिकाणी जाऊन मुख्याधिकारी जावडेकर यांनी धाड टाकत संबंधितावर दंडात्मक कारवाई करून ते ब्युटीपार्लर पुढील पंधरा दिवसांसाठी सील केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग