शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील नौकेवर कारवाई; नौका जप्त, मासळीचा लिलाव

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 22, 2025 16:03 IST

मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे ...

मालवण : अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलाव करण्यात आला. काल, सोमवारी (दि. २१) रात्री ११.३९च्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात ही कारवाई करण्यात आली.मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तेजस्विता भ. करंगुटकर या नियमित गस्त घालत होत्या. यावेळी त्यांना अनधिकृत मासेमारी करणारी परप्रांतीय नौका दिसली. कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली वेदवती स. पुथरण (रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य - कर्नाटक) यांची "श्री महालक्ष्मी ३" (नोंदणी क्र. IND-KA-2-MM-6268) यांची ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मुणगेसमोर अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळून आली.या नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमित हरमलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण/सर्जेकोट तसेच सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमारPoliceपोलिसMalvan beachमालवण समुद्र किनारा