शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक पाठलाग करून आचरा समुद्रात कर्नाटकातील नौकेवर कारवाई, अन्य नौकांनी काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:50 IST

बेकायदा मासेमारी करताना रंगेहाथ पकडले

देवगड : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील आचरा येथील समुद्रात १७ वावांमध्ये (काही किलोमीटर अंतरात) महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करताना देवगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने थरारक पाठलाग करून कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी पहाटे २ः३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.पकडलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, नौकेवरील मासळीचा लिलाव करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देवगड मत्स्यव्यवसाय विभागाची या महिन्यातील ही तिसरी धडक कारवाई आहे. देवगड समुद्रात गेले अनेक दिवस परप्रांतीय नौकांनी धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे स्थानिक मच्छीमार त्रस्त झाले होते. ही कारवाई मत्स्यव्यवसाय परवाना अधिकाऱ्यांच्या टीमने केली.

अन्य नौकांनी काढला पळदेवगड मत्स्य व्यवसाय विभागामार्फत ‘राजभद्र’ या गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालण्यात येत होती. यावेळी आचरा समुद्रात १७ वावांमध्ये कर्नाटकातील मलपी येथील हायस्पीड नौकांचा समूह महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदा मच्छीमारी करीत असल्याचे आढळले. मत्स्य व्यवसाय विभागाने या नौकांचा थरारक पाठलाग केला. यात ‘खुशी-तीन’ नावाच्या मलपी येथील नौकेला रंगेहाथ पकडण्यात यश आले, तर अन्य नौकांनी पळ काढला.

मासळीचा लिलावपकडलेली नौका रात्रीच देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. सकाळी नौकेवरील मासळीचा लिलाव करण्यात आला. या नौकेत कोळंबी, सुरमई, सरंगा, बांगडा, म्हाकुल, कटल आदी प्रकारची मासळी होती. या नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी प्रतिवेदन सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमारindian navyभारतीय नौदल