शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:29 IST

Hindu Janajagruti Samiti sindhudurg-३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, गड, किल्ले आदी ठिकाणी कार्यक्रम पार्ट्या तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान धूम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देमद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्ग : ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, गड, किल्ले आदी ठिकाणी कार्यक्रम पार्ट्या तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान धूम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीनेजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.३१ डिसेंबर या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात अनेक जण मद्यपान, धूम्रपान तसेच अमली पदार्थांचे सेवन करतात. यातून नशा आला की रस्त्यावर वेगाने वाहन चालविणे, महिला व मुलींची छेडछाड काढणे, विनयभंग करणे यांसारखे गैरप्रकार घडतात.

यात युवा पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून, त्यांचे आयुष्य या गैरप्रकारांमुळे उद्ध्वस्त होत आहे. शिवाय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून ध्वनी आणि वायू प्रदूषण केले जाते. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

शिवाय जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अजून कमी झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी मोठे कार्यक्रम झाल्यास त्या ठिकाणी युवा पिढी तसेच नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.यावेळी हिंदू जनजागृती समितीचे गजानन मुंज, यशवंत परब, डॉ अशोक महिंद्रे, रवींद्र परब आदी उपस्थित होते.गैरप्रकार रोखा३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखावेत तसेच मद्यपानावर बंदी घालण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व धुम्रपान करणाऱ्यांवर प्रतिबंध आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीsindhudurgसिंधुदुर्ग