शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सारस्वत बँक अपहारप्रकरणी आरोपीस सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:55 IST

crimenews, sindhudurg, court सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेतील ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील संशयित उपशाखाधिकारी कल्पेश अशोक महाडिक (रा . राजापूर) याची जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ आर. बी. रोटे यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देसारस्वत बँक अपहारप्रकरणी आरोपीस सशर्त जामीनतक्रारीवरून गुन्हा दाखल

कणकवली : सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेतील ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील संशयित उपशाखाधिकारी कल्पेश अशोक महाडिक (रा . राजापूर) याची जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ आर. बी. रोटे यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जाचमुचलक्यावर मुक्तता केली आहे.सन २०१४-२०२० या कालावधीत सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेत उपशाखाधिकारी या पदावर कार्यरत असताना संशयित कल्पेश महाडिक यांनी आरोपी नं. १ प्रल्हाद मनोहर मांजरेकर याने तयार केलेल्या बनावट ह्यओडीह्ण कर्ज खात्यांची माहिती असतानाही ती मंजूर केली होती. तसेच प्रल्हाद मांजरेकर याने काही ओडी खात्यांची कर्जमर्यादा वाढविली असताना महाडिक यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता त्याला मंजुरी दिली होती .सहकर्मचारी मांजरेकर याने खातेदारांच्या नावे मोठ्या प्रमाणात रोख रकमा काढलेल्या व्यवहारांनाही महाडिक यांनी मान्यता दिली होती. काही कर्जदारांची बनावट कर्जखाती असतानाही त्याची खातरजमा न करता लाखो रुपयांच्या रकमा मांजरेकर यांच्या कुटुंबियांच्या नावे गैरप्रकारे हस्तांतरीत करतानाची मंजुरीही महाडिक यांनी दिली होती .प्रतिक्षा बागवे यांच्या नावे बनावट ओडी खाते मांजरेकर याने सुरू केले होते. मांजरेकर याची कणकवली शाखेत बदली झालेली असताना व शाखाधिकारी सौमित्र प्रभू हे वैद्यकीय रजेवर असताना कल्पेश महाडिक याने प्रभारी शाखाधिकारी म्हणून काम करताना बागवे यांच्या खात्याची कर्जमर्यादा १ कोटी १६ लाख एवढी वाढविली होती .या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता. तपासादरम्यान, मांजरेकर याच्या अटकेनंतर महाडिक यालाही अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. त्याच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महाडिक याची ५० हजारांच्या सशर्त जातमुचलक्यावर मुक्तता करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये अशा अटी घातल्या आहेत. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.तक्रारीवरून गुन्हा दाखलतसेच त्या खात्यातून ५० लाख १३ हजार ४८ रुपये अचानक दुसऱ्या खात्यात अनाधिकारी वर्ग केले होते. याबाबत मांजरेकर याचेविरूद्ध बँक शाखाधिकारी निलेश वालावलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलीस स्थनकात गुन्हा दाखल केला होता. तपासात तत्कालीन शाखाधिकारी सौमित्र प्रभू व उपशाखाधिकारी अल्पेश महाडिक व मांजरेकर याची पत्नी यांनाही आरोपी करण्यात आले होते.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग