शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

चोरी करुन नेपाळला पळण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीस अटक, कणकवली पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Updated: April 4, 2025 12:45 IST

कणकवली : कणकवली विद्यानगर येथील हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्याकडे मागील १५ दिवसापासून प्लास्टरचे काम करणारा मूळ नेपाळ येथील रहिवासी ...

कणकवली : कणकवली विद्यानगर येथील हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्याकडे मागील १५ दिवसापासून प्लास्टरचे काम करणारा मूळ नेपाळ येथील रहिवासी कामगार रणजीत शंकर पैसवाल हजरा तुसाद (२८) याने चोरी करुन ३१ मार्च रोजी पोबारा केला होता. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला कणकवली पोलिसांनी शिताफीने अवघ्या १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. हरिचंद्र चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम ४७ हजार व ५.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कुडी,४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठ्या चोरून, दुचाकी घेऊन आरोपीने ३१ मार्चला पळून गेला होता. चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचे छायाचित्र किंवा कोणतीही माहिती नसताना चातुर्याने त्याचे मोबाईल क्रमांक गोपनीय माहितीगाराकडून प्राप्त करून त्याचे लोकेशन घेऊन व सीसीटीव्ही मधून त्याचे छायाचित्र प्राप्त केले.त्यानंतर आरोपी हा पनवेल रेल्वे स्थानक या ठिकाणी असल्याबाबत त्याच्या मोबाईल लोकेशनद्वारे समजले. तत्काळ कणकवलीतील रेल्वेचे पोलिस निरीक्षक सुरवडे यांच्या मदतीने पनवेल रेल्वे पोलिसांची मदत घेऊन आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सर्व दागिने, रोख रक्कम ४४ हजार रुपये  हस्तगत करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, कॉन्स्टेबल आर.के.पाटील, पाटील यांनी केली. पुढील तपास पोलिस हवालदार विनोद सुपल करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस