शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कळणे येथे अपघात; गोव्याची वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:34 IST

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कासारपाल-गोवा येथील पुष्पगंधा पुंडलिक पेडणेकर (६०) या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कळणे येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देकळणे येथे अपघात; गोव्याची वृद्धा ठार कार उलटून अपघात झाला.

दोडामार्ग : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात कासारपाल-गोवा येथील पुष्पगंधा पुंडलिक पेडणेकर (६०) या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कळणे येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.चिनार पुंडलिक पेडणेकर हे आपली पत्नी व आई यांना घेऊन कोल्हापूर येथे चार दिवसांसाठी देवदर्शनासाठी गेले होते. मंगळवारी ते परतले. येताना ते कुडाळ येथे आपल्या नातेवाईकांकडे थांबले होते. त्यांची पत्नी नातेवाईकांकडेच थांबली. तर आईला सोबत घेऊन पेडणेकर घरी येण्यास निघाले.

कळणे येथे आले असता त्यांचा कारवरील ताबा सुटला व गाडी उलटली. या अपघातात त्यांची आई पुष्पगंधा पेडणेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पेडणेकर कुटुंबीय मूळ घोटगेवाडी-दोडामार्ग येथील असून काही वर्षांपासून ते कासारपाल-गोवा येथे स्थायिक झाले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग