शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Accident: कारचा टायर फुटून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By अनंत खं.जाधव | Updated: August 28, 2022 05:29 IST

Accident: बांद्याहून मालवण गोठणे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला असून अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

सावंतवाडी -  बांद्याहून मालवण गोठणे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला असून अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.ही घटना झाराप पत्रादेवी महामार्गावरील नेमळे येथे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

तर यातील जखमीना घेऊन जाणाऱ्या बांदा येथील 108 रूग्णवाहिकेला अपघातस्थळापासून काहि अंतरावर रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला अखेर रूग्णवाहिकेच्या चालकाने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत जखमीला बाहेर काढत दुसऱ्या रूग्णवाहिके तून कुटीर रुग्णालयात दाखल केले.

मालवण तालुक्यातील गोठणे येथील लोचन सुरेश पालांडे( 45) संतोष भास्कर परब( 40) दीपक गोविंद आचरेकर (32) विशाल वसंत हाटले (40) हे चौघेजण बांदा येथे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घाऊक खरेदीसाठी गेले होते तेथून खरेदी करून दुपारच्या सुमारास पुन्हा गोठणे कडे परतत असतना त्याची कार झाराप पत्रादेवी महामार्गावरील मळगाव नेमळेच्या जवळ आली असता  कारचा पुढील टायर फुटून कार  डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे  तब्बल 300 ते 400  मीटर शेतात जाऊन उलटली.ही कार विशाल हाटले हा चालवत होता.

अपघाता नंतर चालकासह त्याच्या बाजूला बसलेला लोचन पालांडे व मागील सीटवरील संतोष परब हे रस्त्यावर फेकले गेले त्यातील पालांडे व परब हे जागीच ठार झाले तर चालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.तर दीपक आचरेकर हा सुखरूप आहे.

अपघाताची भीषणता बघता कार अपघातानंतर डिव्हायडर ओलांडून तब्बल चारशे ते पाचशे मीटर लांब शेतात जाऊन पडली या कार मध्ये मोठ्याप्रमाणात फटाके तसेच सजावटीचे सामान होते.तर काहि सामान अपघातानंतर रस्त्यावर पडले होते.तर यातील मृत परब व पालांडे यांचे मृतदेह ही रस्त्यावर पडले होते.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कारचा वेग नियंत्रण बाहेर होता त्यामुळे चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला आपटून टायर फुटून रस्त्यापलीकडे शेतात गेली त्यामुळे हा एवढा मोठा भीषण अपघात घडल्याचे सांगितले.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिक पोलीसासह वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत बांद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवून  मृतदेह रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविले.तसेच रस्त्यावर विखुरलेले सामान ही बाजूला केले.तसेच या घटनेतील किरकोळ जखमी दिपक आचरेकर यांच्याकडून पोलीसांनी माहिती घेतली त्यावेळी कार मृत पालांडे यांच्या मालकीची असून गंभीर जखमी असलेले हाटले हे कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अपघातानंतर जखमीना नेतना रूग्णवाहिका जळून खाक अपघाताची भीषणता एवढी भयानक होती कि मृताच्या रक्ताचा सडा रस्त्यावर पडला होता.यातील जखमी  हाटले यांना बांदा येथील रूग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतनाच बांदा येथील 108 रूग्णवाहिकने अपघाता पासून काहि अंतरावर पेट घेतला मात्र रूग्णवाहिका चालक सावळाराम गवस यांच्यासह वैद्यकीय अधिकारी अनघा बांद्रे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना रूग्णवाहिकेतून बाहेर काढत दुसऱ्या रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग