शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नाहीत, अमित सामंत यांचा गौप्यस्फोट

By सुधीर राणे | Updated: July 8, 2023 16:56 IST

कुडाळ: प्रतिज्ञापत्रे भरूनही काही जण पदाच्या अभिलाषेने दुसरीकडे गेले असले तरी पक्षात काही फुट पडणार नसुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० ...

कुडाळ: प्रतिज्ञापत्रे भरूनही काही जण पदाच्या अभिलाषेने दुसरीकडे गेले असले तरी पक्षात काही फुट पडणार नसुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्षप्रमुख शरद पवारां सोबतच आहेत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेससिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त करीत अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा गौप्यस्फोट केला.राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सचिव भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमित सामंत म्हणाले, पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी जिल्हा खंबीरपणे उभा होता आणि भविष्यातही राहील. ते जी दिशा दाखवतील त्यावर राजकारण चालेल. प्रतिज्ञापत्र भरलेले काहीजण अजित पवार यांच्याकडे गेले. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाईचे आधीच संकेत दिले होते. ज्या सात जणांची हकालपट्टी करण्यात आली त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जाऊन दाद मागावी. हकालपट्टी केलेली कारवाई चुकीची आहे हे त्यांनी पटवून द्यावे, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्याशी भेटलेले ५४ कार्यकर्ते असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, प्रत्यक्षात ७ जण क्रियाशील सदस्य आणि पदाधिकारी अजित पवार यांना भेटले. बाकीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हते. जे सदस्य अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांची जिल्ह्यातील संघटनेत नोंद आहे. अबिद नाईक हे राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमच्या पक्षात फूट नसून हा छोटासा कपचा उडाला आहे असेही ते म्हणाले. यंत्रणेच्या दबावामुळे बगावत! पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यंत्रणेच्या दबावाखाली येत पक्षाशी बगावत केली हे निषेधार्थ आहे. आम्हाला जास्त यावर बोलायचे नाही आमची भूमिका सर्व समावेशक आहे. असे प्रसाद रेगे म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस