शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी-मोडयात्रेने होणार सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:44 IST

तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचºया थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले.

ठळक मुद्देराजकीय नेत्यांची गर्दी : देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा पहाटेपासून ओघ सुरू : भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू

सिद्धेश आचरेकर

मालवण : तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचºया थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन कमी कालावधीत घेता आले. सकाळच्या सत्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी वाटत असला तरी सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. त्यामुळे आंगणेवाडी गाव लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. 

दरम्यान, दीड दिवस चालणाºया भराडी देवीच्या वाषिकोत्सवाची सांगता मंगळवारी मोड यात्रेने होणार आहे. दुसºया दिवशीही हजारो भाविक देवीचरणी नतमस्तक होतात. त्यामुळे दोन दिवस चालणाºया या यात्रोत्सवात व्यापाºयांनी थाटलेल्या दुकानांतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. एस. टी. महामंडळाने मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्थानकांवरुन प्रवाशांना सुरळीत सेवा पुरविली. तसेच गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. 

आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे   भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने झाले. सकाळच्या सत्रात अनेक राजकीय, शैक्षणिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दशर्नासाठी आंगणेवाडीत मांदियाळी फुलली. यात्रा भाविकांच्या गर्र्दीने गजबजून गेली होती. केंद्रीय वाणिज्य व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू, महाराष्ट स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, नीलम राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार राजन विचारे, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच अनेक स्थानिक राजकीय नेत्यांनी देवीचे दर्शन घेतले.

 भाविकांनी घेतले शिस्तबद्ध दर्शन

देवीची स्वयंभू पाषाणमूर्र्ती अलंकारांनी सजविण्यात आली होती. पाषाणाला मुखवटा घालून साडी-चोळी नेसवली तसेच भरजरी वस्त्रे, अलंकार, दागिने घालून देवीला सजविण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत होते. भाविकांच्या आदरतिथ्यासाठी आंगणे कुटुंबीय सज्ज होते. 

 

 

भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू 

मालवण : गोरेगाव-मुंबई येथून आंगणेवाडी यात्रेसाठी आलेल्या उदय दत्तात्रय सावंत (४९) यांचा सोमवारी सकाळी एसटीमध्ये प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

 गोरेगाव येथील उदय सावंत मित्रांसोबत आंगणेवाडी यात्रेसाठी सोमवारी सकाळी आले होते. आंगणेवाडीतील कणकवली बसडेपो मधील एसटीमध्ये ते बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. त्यांना मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी तपासले असता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

सावंत यांचा मृतदेह मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास कट्टा दुरक्षेत्राचे रुक्मांगत मुंडे, स्वप्नील तांबे हे करत आहेत. सायंकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 

टॅग्स :Templeमंदिर