शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg news: मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2023 16:06 IST

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही

मालवण (सिंधुदुर्ग) : ओझर येथे आंब्याच्या झाडास एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. निलेश गोविंद तोंडवळकर (४२ रा. तोंडवळी वरची) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत. स्थानिकांना तसेच अन्य दुचाकीस्वारांना सकाळच्या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हा मृतदेह निलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचा भाऊ गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. निलेश तोंडवळकर हे आज सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी लावलेली दिसून आली. १० वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना, स्थानिक ग्रामस्थांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी