शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्हील एक्सल तुटला, सिमेंटची पोती भरलेला ट्रक शेतात उलटला; फोंडाघाटानजीक झाला अपघात

By सुधीर राणे | Updated: October 4, 2022 16:07 IST

चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती

कणकवली : फोंडाघाटाच्या पायथ्यापासून काही अंतरावर, पिंपळवाडी येथील एका वळणावर आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक अवजड ट्रकचा (क्रमांक एम.एच. ११ ए.एल.५०२०) पुढील व्हील एक्सल तुटल्याने आणि टर्न न बसल्याने, लगतच्या शेतात उलटल्याने अपघात झाला. या ट्रकमध्ये सिमेंट भरलेले असून तो कोल्हापूरहून कणकवली मार्गे गोव्याकडे जात होता. ट्रकचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे.अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला प्रथम दर्शनीनी फोंडाघाट तपासणी नाक्यापर्यंत पोहोचविले. तेथील पोलीस शिपाई यांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाण्यासाठी रिक्षा करून दिली. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत त्याचा ठावठिकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा गावातील इतर खासगी डॉक्टरांकडे चौकशी अंतीही लागला नाही. त्यामुळे चालक कुठे गायब झाला? याची चर्चा फोंडाघाट परिसरात सुरू होती. शिवाय पोलीस तपासणी नाक्यावर त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.फोंडाघाट आय.टी.आय. ते साईमंदिर आणि तपासणीनाका ते घाटरस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकाना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच क्लीनर शिवाय येणाऱ्या मोठ्या अवजड ट्रक सारख्या वाहनांना अपघातास सामोरे जावे लागते आहे. मंगळवारी झालेला अपघात मोठ्या खड्ड्यामुळे, पॉवर व्हीलर एक्सेल तुटल्याने झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रस्ते विभागाने गांभीर्याने लक्ष घालून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुसह्य करावा, आणि संभाव्य अपघात हानी तसेच  जनक्षोभ टाळावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात