शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

By अनंत खं.जाधव | Updated: November 8, 2023 18:59 IST

सावंतवाडी :  रुग्णवाहिकेला बोलवा असे सांगितल्याच्या रागातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशांत वाडकर या सुरक्षा रक्षकाला एका युवकाकडून ...

सावंतवाडी :  रुग्णवाहिकेला बोलवा असे सांगितल्याच्या रागातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रशांत वाडकर या सुरक्षा रक्षकाला एका युवकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.सुरक्षा रक्षकांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षारक्षकालाच मारहाण होत असेल तर डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सावंतवाडी कुटीर रुग्णालयात रात्री उशिरा एक युवक दुचाकी अपघातातील जखमी रुग्णाला घेऊन रुग्णालयात आला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलवा अशा सूचना त्यांना केल्या. याचा राग मनात धरून त्याने आपल्याला बेदम मारहाण केली, असे वाडकर यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी तेथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी भक्ती सावंत यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली, असे वाडकर यांनी सांगितले.दरम्यान झालेल्या घटनेनंतर अधिक उपचारासाठी वाडकर यांना गोवा येथे हलविण्यात आले आहे वाडकर याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सुरक्षारक्षक संघटना येऊन या ठिकाणी तक्रार देणार आहे, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

रूग्णालयाला पोलीस संरक्षण द्या : डाॅ.ऐवाळे सावंतवाडीत कोरोना काळात ज्या काहि देवदूतानी काम केले त्यात प्रशांत वाडकर याचेही नाव घेतले पाहिजे त्याने या काळात चांगले काम केले अशा कर्मचारीवर्गावर जर हल्ला होत असेल तर ते योग्य नाही.या प्रकरणाची रूग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून रूग्णालयास पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी