शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर झालेली मशीन मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 12, 2024 18:42 IST

अधिकारी एक तासाने कार्यालयात परतले

सिंधुदुर्ग : खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन मंजूर असतानाही ती देण्यास टाळाटाळ होत आहे. घे भरारी महिला बचतगट कवठी या गटाच्या सदस्या साक्षी सुभाष जोशी यांनी सोमवारी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान या बचत गटांबाबत तक्रार आली असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे कार्यालयाचे अधिकारी उदय मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.कुडाळ तालुक्यातील कवठी गावातील ‘घे भरारी महिला बचत गटाने’ खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षण पूर्ण होताच या बचत गटाच्या महिलांना उमेदमार्फत प्रमाणपत्रही देण्यात आली. त्यानंतर या बचतगटाला कोकम सरबत तयार करणारी मशीन मंजूर झाली होती. त्याची २५ टक्के रक्कमही या बचत गटाने भरली आहे.मात्र असे असतानाही या बचतगटाला मशीन देण्यास टाळाटाळ होत असल्याने या बचत गटाच्या महिलांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयाशी संपर्क साधला असता आपल्याला मशीन मंजूर असून लवकरच त्याचे वितरण केले जाईल, असे कार्यालय प्रमुख मराठे यांच्याकडून वारंवार सांगितले जात होते. त्यात शनिवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या कार्यक्रमात या मशीनचे उर्वरित बचतगटांना वाटप करण्यात आले आहे. मात्र आपल्या बचतगटाला देण्यात आली नाही, असे बचत गटाच्या सदस्या साक्षी जोशी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान साक्षी जोशी यांनी कार्यालयात येत चौकशी केली असता अधिकाऱ्याकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याने आणि आपल्याला मशीन देण्यास टाळाटाळ होत असल्याने साक्षी जोशी यांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयातच ठिय्या आंदोलन छेडले. जो पर्यंत मशीन दिली जात नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला.अधिकारी एक तासाने कार्यालयात परतलेसाक्षी जोशी यांनी खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यावर संबंधित कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी कार्यालयाबाहेर गेले. ते तब्बल एक तासाने कार्यालयात परतले असल्याचेही यावेळी आंदोलनकर्त्या जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagitationआंदोलन