शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ येथे उद्या व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा, चित्रकार किरण हणमशेठ करणार मार्गदर्शन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2023 14:20 IST

कुडाळ : एमआयडीसीमधील श्री गणेश स्वामी कलादालनात रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या ...

कुडाळ : एमआयडीसीमधील श्री गणेश स्वामी कलादालनात रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या कालावधीत बेळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार किरण हणमशेठ यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिचित्र (पोट्रेट) प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.चित्रकला क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना चित्रकला क्षेत्रातील व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, वस्तूचित्र, कंपोजीशन तसेच कला क्षेत्रातील विविध विषयांची माहिती प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाद्वारे व्हावी याकरिता श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळच्यावतीने ही कार्यशाळा होणार आहे.यावेळी केबीके चित्रमंदिर ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कलामहर्षी के. बी. कुलकर्णी यांचे नातू शिरीष कुलकर्णी, चित्रकार अनिल कुबल (मुंबई), सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, पी. के. सावंत पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, चित्रकार अनिल आचरेकर (मुंबई) तसेच इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.विविध पुरस्कारांचे मानकरीयावेळी व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक दाखवणारे किरण हणमशेठ हे चित्रकार के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य असून ते कोल्हापूर शिणोली येथील जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्या चित्रांची मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट मुंबई येथे तीन तर नेहरू आर्ट सेंटर मुंबई व पुणे येथे प्रदर्शने झाली आहेत. त्यांना आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड २००१ चा तसेच रवी परांजपे युवा कलाकार पुरस्कार २०१० व कलामहर्षी के. बी. कुलकर्णी कलागौरव पुरस्कार २०२२ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, पालक व कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन चित्रकार रजनीकांत कदम यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग