शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवा बजावत असतनाच पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 

By अनंत खं.जाधव | Updated: March 10, 2024 15:47 IST

आंबोली पोलिस दुरक्षेत्रावरील घटना, पोलिस दलात हळहळ 

सावंतवाडी : सावंतवाडीपोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश रघुनाथ दुधवडकर (54 रा.सालईवाडा सावंतवाडी) याचा पोलिस सेवा बजावत असतना रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात एकच हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेनंतर जगदीश दुधवडकर याचा मृतदेह सावंतवाडीत आणण्यात आला असून दुपारनंतर त्याच्या मुळ गावी हलविण्यात येणार आहे.

सावंतवाडी पोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर जगदीश दुधवडकर हे गेली वर्षभर कार्यरत होते.शनिवारी रात्री त्यानी आपले दैनंदिन कामकाज  संपवून झोपी गेले होते. त्यानंतर सकाळी उठून आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी तयारी करत असतनाच त्याना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले त्याना पुढील उपचारार्थ आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वी च त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सोबत असलेले कर्मचारी चांगलेच हादरून गेले होते.

दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते.नंतर ते काहि काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते अलिकडेच एक वर्षापासून आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर सेवा बजावत होते. अशातच रविवारी सकाळी झोपून उठल्यानंतर ते दुरक्षेत्राच्या आवारात झाडू मारत असतनाच अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.आणि ते खाली कोसळले.

ही घटना कार्यरत असलेल्या इतर पोलिस कर्मचारी यांनी बघितली आणि लागलीच आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.पण दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती  सावंतवाडी पोलिस ठाण्यात कळविण्यात आली त्यानंतर पोलिस यंत्रणाही चांगलीच हादरून गेली अनेकांना अश्रू अनावर झाले.पोलिस अधिकारी आंबोली कडे रवाना झाले.व दुधवडकर याचा मृतदेह आंबोली येथून सावंतवाडीत कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.घटनेची माहिती मिळताच ओरोस येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सावंतवाडी रूग्णालयात धाव घेतली दुधवडकर याच्या पत्नीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.दुपारनंतर दुधवडकर याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी कुडाळ तालुक्यातील कर्ली येथे हलविण्यात येणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूSawantwadiसावंतवाडी