शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गांजा बाळगल्याप्रकरणी वारगाव येथील एकजण ताब्यात

By सुधीर राणे | Updated: November 13, 2023 12:24 IST

कणकवली: वारगाव, रोडयेवाडी येथील एका व्यक्तीजवळ गांजा आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रवीण आत्माराम गुरव ...

कणकवली: वारगाव, रोडयेवाडी येथील एका व्यक्तीजवळ गांजा आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रवीण आत्माराम गुरव (वय ५२) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ हजार ५०० रुपये किंमतीचा ८३ ग्राम गांजा, चिलीम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. गुरव याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गांजा विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने वारगाव येथील प्रवीण गुरव यांच्या राहत्या घरी जात तपासणी केली. यावेळी पाच पॅक बंद पाऊच मध्ये हिरवट रंगाच्या उग्र वासाचा गांजा सदृश पदार्थ व एक चिलीम आढळून आली.  गांजा व चिलीम जप्त करून प्रवीण गुरव याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपण गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले.  याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे हवालदार किरण देसाई यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने अवैध गांजा विक्री व खरेदी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. असे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी