कणकवली: कणकवली तालुका मराठा समाजाच्यावतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा समाजावर जालना येथे झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरीता सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या मोर्चाच्या नियोजनासाठी उद्या सकाळी १०.३० वाजता कणकवलीतील मराठ मंडळ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कणकवलीसहित जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार नाईक आणि सावंत यांनी केले आहे.यावेळी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सावंत म्हणाले नितेश राणेंची मराठा समाजाविषयीची भूमिका सोयीस्कर असते. काँग्रेसमध्ये असताना धर्मनिरपेक्ष तर आता भाजपमध्ये गेल्यावर हिंदूत्ववादी भूमिका घेऊन ते आपला दुटप्पीपणा दाखवून देत असल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला.
जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधासाठी येत्या सोमवारी कणकवलीत मोर्चा, मराठा बांधव सरकारचा निषेध करणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 2, 2023 18:25 IST