शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी जवळ बिबट्या पडला विहिरीत; कुत्र्याची शिकार करणं आलं आंगलट

By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2022 17:19 IST

सावंतवाडी जवळील गावात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला.

सिंधुदुर्ग : कोंबड्यासह भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी गावात आलेल्या बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील रूपेश सावळ यांच्या विहिरीत पडला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र यांची माहिती वनविभागाला मिळताच त्यानी या बिबट्याला सुखरूप पणे बाहेर काढत जंगलात सोडले आहे. न्हावेली येथील नागझरवाडी येथे रूपेश सवाळ यांच्या विहिरीत बिबटया पडला असल्याचे दिसले यांची माहिती लागलीच वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर यांच्यासह बचाव पथक न्हावेली गावात पोहचले. 

बिबट्याला पकडण्यात आले यश बिबट्या पडलेली विहिरीत ही चिरेबंदी असून 40 फुट खोल आहे. कठड्यापासून सध्याची पाण्याची पातळी अंदाजे 15 फुटावर असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे गृहीत धरून उपाय योजना आखण्यात आली. हा बिबट्या रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आला असावा. अंधारामुळे त्याला विहिरी समजली नसल्यानेच तो विहिरीत पडल्याचे वनविभागाने सांगितले त्यातच विहिरीत गुहेसारखी भगदाड असल्याने त्यात हा बिबट्या जाऊन बसला होता. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ विहिरीकडे जमू लागल्याने वनविभागाला बचाव कार्य हाती घेतना अनेक अडचणी येऊ लागल्या. अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने लोखंडी पिंजरा विहिरीत सोडत अलगद पणे बिबट्याला कैद केले. हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा होता. 

बिबट्याला पकडताच वन्यजीव वैद्यकीय डॉक्टर यांचेकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचावकार्यात न्हावेलीच्या ग्रामस्थांकडून मोठी मदत झाल्याचे वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी सांगितले यावेळी वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर आदि बचाव पथकात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्याSawantwadiसावंतवाडीFarmerशेतकरी