शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चौघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:23 IST

बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने चौघांवर जीवघेणा हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. प्रभाकर मुळीक, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आनंद न्हावी अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर मळेवाड प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर उपवनसंरक्षक, वनविभाग कर्मचारी, पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून, बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.मळेवाड-कोंडुरे परिसरात बिबट्याचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून बिबट्या दृष्टीस पडतो. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपले भक्ष्य करण्यासाठी बिबट्या आला होता. त्याच्या हालचालींची चाहूल लागल्याने मुळीक यांनी घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या आला. त्याने काही समजण्याच्या आत मुळीक यांच्यावर हल्ला चढवला. तसेच पंजाचा मारा केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच हाताला गंभीर दुखापत झाली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पलायन केले. यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

ही घटना ताजी असतानाच मळेवाड-देऊळवाडी येथील सूर्यकांत सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडविले. सावंत यांना सोडवताना ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर, आनंद न्हावी यांना बिबट्याने जखमी केले आहे. या सर्वांना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमदिवसाढवळ्या भरवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्यास पाण्यातून बागेबाहेर जाणे कठीण आहे. त्यामुळे तो बागेतच असावा, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम गावात दाखल झाली आहे.