शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगेलीतील गिरीजानाथ प्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी, दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान 

By अनंत खं.जाधव | Updated: March 25, 2024 17:37 IST

फणसाच्या खोडापासून शेकडो सुतार कारागीरांनी घडविली गिरोबाची मूर्ती

सावंतवाडी : ग्रामदेवतेची दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान असलेल्या सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथाची पुन: प्रतिष्ठापना हरहर महादेवच्या जयघोषात विधीवत करण्यात आली. या गावच्या आगळ्यावेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ग्रामदेवतेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला भाविकांची झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी हे यावर्षीच्या गिरोबा उत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले. असून या उत्सवासाठी भाविकांचा महापूर लोटला होता. हजारो भाविक गिरीजानाथ चरणी नतमस्तक झाले होते.शनिवारी सायंकाळपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल सहा तासानंतर फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती शेकडो सुतार कारागीरांनी घडविली. या धार्मिक कार्यात सांगेली परिसरातील शेकडो सुतार समाज्यातील कारागीरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दरम्यान मध्यरात्री असूनही या उत्सवासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता. तब्बल २४ वर्षानंतर सनामटेंबवाडीत हा उत्सव होत असल्यामुळे सनामटेंबवाडीवासियांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते. गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर प्रतिष्ठापनेसाठी रविवारी मध्यरात्री १२ नंतर सनामटेंबवाडी येथुन सवाद्य मिरवणुकीने गिरिजानाथ मंदिराकडे निघाली.  या मिरवणुकी दरम्यान गिरोबाच्या या मूर्तीला खांद लावण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी शेकडो भाविकांनी गिरोबाला खांद लावण्याचा नवसफेड केला. यावेळी मिरवणुकीच्या मार्गादरम्यान सांगेलीवासियांनी गिरिजानाथाची मूर्ती घडवणाऱ्या सुतार समाजाकडे तळी प्रदान केली. साखर झोपेची पहाटेची वेळ असूनही या धार्मिक सोहळ्यासाठी गिरीजानाथ मंदिर ते देवकरवाडी मार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजलेला होता. तसेच या मार्गातील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नेत्रदीपक आतषबाजीसह वाजत गाजत नाचत ही मिरवणूक तब्बल चार तासानंतर पहाटे ४ वाजता गिरिजानाथ मंदिराकडे पोहोचली. यावेळी जुना देव नेमातून काढूल्यानंतर जुना आणि नवीन देवाची भेट घडविण्यात आली. दोन्ही देवतांच्या भेटीचा हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पहाटे साडे पाचच्या सुमारास हरहर महादेव च्या जयघोषात विधीवत गिरीजानाथाची पुन: प्रतिष्ठापना करण्यात आली.त्यानंतर रविवारी सकाळपासूनच सायंकाळ पर्यंत हजारो भाविकांनी गिरीजानाथाचे दर्शन घेतले. गिरीजानाथाच्या दर्शनासाठी दिवसभरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या उत्सवासाठी सोहळ्यासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आदी भागातील भाविक आवर्जून उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग