शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

डिंगणे-बांबरवाडीत भर दिवसा काजू बागेत गव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:31 IST

काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत.

बांदा : डिंगणे-बांबरवाडी येथे भर दिवसा काजू बागेत गव्या रेड्यांचा कळप दृष्टीस पडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी विलास मांजरेकर यांच्या काजू बागेत तब्बल १५ हुन अधिक गव्यांच्या कळपाचा वावर होता.काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत. आज नेहमीप्रमाणे मांजरेकर हे डिंगणे-बांबरवाडी येथील आपल्या काजू बागेत काजू बी गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तब्बल १५ हुन गव्यांच्या कळपाचा बिनधास्त वावर असल्याचे दिसून आले.त्यांनी प्रसंगावधान दाखवत गव्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र गव्यांची संख्या अधिक असल्याने त्यांनी बागायतीतून काढता पाय घेतला. भर दिवसा गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजू हंगाम सुरुवात झाल्याने गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार देखील भविष्यात होऊ शकतात. यासाठी या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.सायंकाळी उपसरपंच जयेश सावंत, बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी काजू बागायतीत जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या.डिंगणे गावात जंगलमय भागात गव्यांची संख्या ही प्रचंड वाढली आहे. बांदा-डिंगणे रस्त्यावर देखील कित्येकदा भर दिवसा गव्यांचा कळप दृष्टीस पडला आहे. कित्येकवेळा हे गवे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे देखील जीवावर बेतणारे ठरू शकते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग