शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Sindhudurg: गव्यांचा कळप आडवा आला, अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 14, 2024 18:26 IST

भुदरगड येथून गोव्याकडे जाताना झाला अपघातात

आंबोली (सिंधुदुर्ग) : गव्यांचा कळप अचानक गाडीच्या आल्याने झाल्याने अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. स्वप्निल श्यामराव कांबळे (वय-२९) असे जखमीचे नाव आहे. सुदैवाने स्वप्निल यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने गंभीर दुखापत झाली नाही. आंबोली फणसवाडी येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.स्वप्निल हा गोवा येथे आरोग्य विभागामध्ये १०८ ॲम्बुलन्सवर कार्यरत आहे. तो भुदरगड या आपल्या गावाहून दुचाकीने गोव्याकडे निघाला होता. आंबोली फणसवाडी येथे त्याच्या दुचाकीच्या समोर गव्याचा कळप आला. यातील एका गव्याचे शिंग त्याच्या गाडीच्या पुढील चाकामध्ये अडकले गेल्याने गाडी तशीच फरपटत झाळकटीमध्ये घेऊन गेला. अपघातात स्वप्निल हा किरकोळ जखमी झाला. सुदैवाने स्वप्निल यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिकांनी तत्काळ स्वप्निल याला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्वरित वनविभागाचे कर्मचारी व वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. अधिक उपचारासाठी स्वप्निल याला रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात