शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आश्चर्यजनक! कंटेनरमधून उडी मारली अन् वीजतारेवर अडकली, तरीही बकरी जिवंत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:01 IST

गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या बकऱ्या नेणाऱ्या कंटेनरमधील प्रकार

सावंतवाडी: ‘देव बलवत्तर असेल तर काहीही होऊ शकते, एखाद्याचा गेलेला जीवही परत येऊ शकतो,’ याचा प्रत्यय बुधवारी सावंतवाडीत आला. गोव्याहून गुजरातकडे बकऱ्या नेणाऱ्या कंटेनरमधून एका बकरीने उडी मारली आणि ती प्रवाहीत विद्युत वाहिनीवर अडकली.

काही जणांना वाटले की बकरी मृत पावली आहे, पण देव बलवत्तर असल्यामुळे ती बकरी विद्युत प्रवाहात जिवंत राहिली, ही आश्चर्यजनक घटना म्हणावी लागेल. अखेर ती बकरी स्थानिकांच्या मदतीने काढण्यात आली व नंतर ती सुखरूप मार्गस्थ झाली. हा प्रकार उपरलकर देवस्थानाजवळ सावंतवाडी - आंबोली रस्त्यावर घडला.गोवा येथील बकऱ्यांचे काही व्यावसायिक चार ते पाच मोठ्या कंटेनरमधून बकऱ्या घेऊन गुजरातच्या दिशेने जात होते. या कंटेनरमधील एका बकरीने कंटेनरमधून उडी मारली आणि ती प्रवाहित विद्युत वाहिनीवर अडकली. तिचे शिंग विद्युत वाहिनीमध्ये अडकले आणि ती तशीच उशिरापर्यंत लोंबकळत होती...असे सुरू झाले बचावकार्यकाही जणांना वाटले की, बकरी विद्युत वाहिनीत अडकून मृत्यू पावली आहे. मात्र, काही वेळाने बकरीची हालचाल दिसून आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी मदतकार्य सुरू केले. या बकरीला वीज वाहिनीवर लोंबकळताना पाहून काही लोकांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज कंपनीचे कर्मचारी तिथे आले. सर्वांनी मिळून लाकडाच्या मदतीने बकरीला प्रवाहित विद्युत वाहिनीमधून सुरक्षितपणे काढण्यात आले. त्यानंतर संबंधित ड्रायव्हर बकरीसह तिथून निघून गेला.बघ्यांची मोठी गर्दीहा प्रकार पाहण्यासाठी स्थानिकांनी आणि महामार्गावरील प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. बकरी खाली काढल्यानंतर चालक तिला घेऊन तिथून निघून गेला.