शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडांसह वानरांची होणार प्रगणना 

By अनंत खं.जाधव | Updated: May 23, 2024 21:21 IST

वनविभागाकडून प्रथमच उचलण्यात आले पाऊल : तीनशे जणांना देण्यात येणार प्रशिक्षण.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हात होत असलेला माकड व वानर याचा उपद्रव  रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभाग  माकड व वानर यांची शास्रोक्त पद्धतीने प्रगणना करणार असून यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक अशा तीनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण गुरूवार पासून सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील माकड व वनर यांच्या उपद्रवामुळे फाळबागायती व शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड व वानर निर्मिती निर्बीजीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव  यांच्या अध्यक्षतेखाली जलद कृती दल ची निर्मिती कारण्यात आलेली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हात माकड व वानर यांची शास्रोक्त पध्दतीने प्रगणना करणे व त्यांच्या संख्येत झालेली वाढ नोंदविण्यात येणार आहे.

सावंतवाडी वन विभागातील वन अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक असे जवळजवळ ३०० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षक म्हणून तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील डॉ. एच.एन. कुमारा हे येणार आहेत. तर २५ मे पासून ही प्रगणना प्रत्यक्षात जिल्हाभर पार पाडण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हात प्रथमच माकड व वानर यांची प्रगणना होणार असून यात वनविभाग कितपत यशस्वी होणार हे बघावे लागणार आहे.या प्रगणने बाबत वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी माहिती दिली असून ही प्रगणना यशस्वी होईल असा दावा त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग