शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

By सुधीर राणे | Updated: September 24, 2022 12:23 IST

दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल

कणकवली : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कणकवलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर काल, शुक्रवारी फटाके लावून घोषणाबाजी व जल्लोष करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यात शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर, नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रामदास विखाळे, ऍड. हर्षद गावडे, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी येत घोषणाबाजी करणे, फटाके लावणे व यातून मनाई आदेशाचा भंग करणे यामुळे हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मनाई आदेश असताना अशाप्रकारे घोषणाबाजी करणे किंवा फटाके वाजवणे हा मनाई आदेशाचा भंग आहे. जर आमच्यावर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात मग हे गुन्हे का दाखल झाले नाहीत? असा सवाल शिंदे गटाचे कार्यकर्ते सुनील पारकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. आज, शनिवारी सकाळपर्यंत जर गुन्हे दाखल नाही झाले तर कणकवली पोलिसांकडे निवेदन देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र, तत्पूर्वीच रात्री उशिरा शिवसैनिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना