शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वसोलीत दुचाकी कॉजवेवर पुराच्या पाण्यात पडली, तरुण वाहून गेला; शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:43 IST

सहकारी बचावला : माणगाव खोऱ्यातील मुसळधार पावसाने नद्यांना पुरस्थिती

कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसोली कुत्रेकोंड कॉजवेवरून जाताना पुलाच्या काठावरुन दुचाकी पुराच्या पाण्यात गेल्याने दुचाकीस्वार अमित मोहन धुरी (३०, माणगाव धरणवाडी) हा वाहून गेला.तर मागे बसलेला त्याचा सहकारी सखाराम कानडे (६२, माणगाव डोबेवाडी) सुदैवाने बचावला. एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून वाहून गेलेल्या युवकाचा मंगळवारी दिवसभर शोध सुरू होता. रात्री उशिरा जास्त पावसामुळे नदीला पूरस्थिती असल्याने शोध मोहीम स्थगित करण्यात आली.‎‎कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात गेला आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे कर्ली नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाली आहे. सोमवारी सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे कठडा नसलेल्या वसोली कुत्रेकोंड कॉजवेवर पाणी आले होते.त्याच दरम्यान माणगांव येथून दुचाकीने अमित धुरी आणि सखाराम कानडे हे दोन युवक शिवापूरला जात होते. वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी कॉजवेवरील पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री कॉजवे वरील पाण्याचा अंदाज नआल्याने दुचाकी पुलाच्या काठावरुन पुराच्या पाण्यात गेली. त्यात अमित धुरी हा वाहून गेला, दुचाकीवर मागे बसलेला सखाराम कानडे याने काठावरील झाडाला धरल्याने तो बचावला.

गाडी जाणार नाही सांगूनही..कॉजवेवर पाणी असल्यामुळे गाडी जाणार नाही, असे सखाराम कानडे याने अमित धुरी याला सांगितले मात्र पाणी कमी आहे आपली गाडी जाऊ शकते असे अमित याने सखाराम कानडे यांना सांगितले व आपल्या ताब्यातील गाडी काॅजवेवरील पाण्यातून अमितने घातली, मात्र काॅजवेवर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अमितचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही गाडीसह काॅजवेवरच पडले. अमितचा गाडीचा हात सुटल्याने तो कॉजवे खाली गेला. त्या पाठोपाठ सखाराम कानडे काॅजवे वरील पाण्यात पडला.सुदैवाने सखाराम कानडेच्या हाताला नदीपात्रातील झाड लागल्याने तो आधार पकडून तो काठावर आला.तर अमित वाहुन गेला, असे सखाराम कानडे यांने सांगितले.

रात्रीची वेळ धावपळ पडली अपुरीबचावलेल्या सखाराम कानडेने घटनास्थळी धावपळ गेली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वसोली येथील दुकानावर धाव घेत झालेला घटनाक्रम ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर सर्वत्र फोनाफोनी व धावपळ सुरू झाली. पण रात्रीची वेळ असल्याने सर्वच यंत्रणांना मर्यादा आल्या.

‎कुडाळ तहसीलदार, पोलिस निरीक्षक रात्रीच घटनास्थळीसोमवारी रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेतून वाचलेल्या सखाराम कानडे याची त्यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

जिल्ह्यात पावसाची संततधारदरम्यान, जिल्ह्यात गेले दोन दिवस अधूनमधून पावसाची संततधार सुरू असल्याने ग्रामीण भागातील अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.