शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दळवी महाविद्यालयाचे प्राविण्य, मुंबई येथे पार पडला ५२ वा युवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:39 IST

मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाने यश संपादन करून प्राविण्य मिळविले. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.

ठळक मुद्दे दळवी महाविद्यालयाचे प्राविण्य, मुंबई येथे पार पडला ५२ वा युवा महोत्सवविविध स्पर्धांमध्ये सिंधुदुर्गचे केले प्रतिनिधित्व

दोडामार्ग : मुंबई येथे पार पडलेल्या ५२ व्या युवा महोत्सवात तळेरे येथील दळवी महाविद्यालयाने यश संपादन करून प्राविण्य मिळविले. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्यानंतर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.आॅगस्ट महिन्यात कणकवली येथे जिल्हास्तरीय महोत्सव पार पडला होता. त्यामध्ये अक्षय मेस्त्री, अंकिता कोकरे, सायली पालव, अनिकेत तर्फे आणि प्रतीक वरुणकर या विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात अली होती. याअंतर्गत विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवात पेंटिंग, डीबेट, क्ले मॉडेलिंग, पोस्टर मेकिंग, कथाकथन अशा विविध कलाप्रकारात महाविद्यालयाने आपला सहभाग नोंदवला होता.युवा महोत्सवामध्ये अंतिम फेरीसाठी सुमारे २९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम वर्ष बीएमएमचा विद्यार्थी अक्षय मेस्त्री याने क्ले मॉडेलिंगमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. क्ले मॉडेलिंग स्पर्धेमध्ये एकूण २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रा. विनायक दळवी यांचे विद्यार्थी व ३ वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते राजेश केणी यांचे क्ले मॉडेलिंगसाठी विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख सहा. प्रा. सूरज लिंगायत यांचे मार्गदर्शन व सहा. प्रा. सुप्रिया जाधव यांचे सहकार्य लाभले.कुलगुरूंची विद्यार्थ्यांशी हितगुजदळवी महाविद्यालयाच्या भूदात्या कॅप्टन निलिमा प्रभू यांनी स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी भेट घडवून आणली. दळवी महाविद्यालयाला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे अनेकदा महाविद्यालयाला भेट देतात. कुलगुरू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र असल्याने त्यांचे नेहमी दळवी महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेम मिळते. तसेच ते शिक्षक व विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. 

टॅग्स :universityविद्यापीठsindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक