शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कणकवलीत ७७ टक्के मतदान; नगरपंचायत निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:13 IST

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतर्गत जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच १७ पैकी १६ नगरसेवक निवडण्यासाठी शुक्रवारी शांततेत ७६.९७ टक्के  मतदान झाले. गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतर्गत जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच १७ पैकी १६ नगरसेवक निवडण्यासाठी शुक्रवारी शांततेत ७६.९७ टक्के  मतदान झाले. गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठीच्या ४ तर नगरसेवक पदासाठीच्या ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, आता प्रभाग १0 मध्ये नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर १२ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहिर केला जाणार आहे. दरम्यान, गेल्या तीन निवडणुकांपेक्षा यावर्षी मतदानात वाढ झाल्याने निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे.       कणकवलीतील १६ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. ९.३0 वाजेपर्यंत १६.३३ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११.३0 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. वृध्द मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यंत ३५.८४ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ५३.८५ टक्के मतदान झाले. या वेळेपर्यंत ६ हजार ३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तिसºया टप्प्याच्या अखेर  ३ हजार २९४ पुरुष आणि ३ हजार ६९ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यंत सर्वात जास्त प्रभाग २ मध्ये ६४.८५ तर सर्वात कमी प्रभाग ५ व ७ मध्ये ४७.0८ टक्के इतके  मतदान झाले होते.    दुपारी ३.३0 वाजे पर्यंत ६७.५८ टक्के मतदान झाले होते. तर ५.३0 वाजेपर्यंत एकूण ७६.९७ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरुन मतदान यंत्रे येथील तहसील कार्यालयात कर्मचाºयांनी जमा केली. ती ‘स्ट्रॉन्ग रूम’ मध्ये ठेवण्यात आली आहेत.जनता स्वाभिमानला कौल देणार !ही लढाई कणकवलीच्या विकासाची आहे. कणकवली नगरपंचायतीवर स्वाभिमानचीच सत्ता येणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यावर कणकवलीकरांचा विश्वास आहे. त्यामुळे जनता स्वाभिमानलाच आपला कौल देईल. अशी प्रतिक्रिया आमदार नीतेश राणे यांनी  व्यक्त केली.नेत्यांकडून मतदानाचा आढावा!आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, समीर नलावडे, प्रमोद जठार, सतीश सावंत, दत्ता सामंत, रेश्मा सावंत, अतुल रावराणे,  राकेश राणे, विलास कोरगावकर यांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मतदान केंद्रांना भेट देवून मतदानाचा शुक्रवारी दिवसभर  अधून मधून आढावा घेण्यात येत होता.कडक पोलिस बंदोबस्त !नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्या देखरेखीखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन पोलिस निरीक्षक , १२ उपनिरीक्षक व ९१ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यात प्रत्येक बुथवर एक पोलिस तर बूथ पासून १00 मिटर अंतरावर एक अधिकारी, चार कर्मचारी , एक हत्यार बंद पोलिस व व्हिडिओ कॅमेरामन ठेवण्यात आले होते. सहा इमारतीमध्ये मतदानासाठी १६ मतदान केंदे तयार करण्यात आली होती. सहा इमारतींचे तिन सेक्टर करण्यात आले होते. तर प्रत्येक सेक्टर वर पोलिस अधिकारी , व्हिडिओ कॅमेरामन व हत्यार बंद पोलिस ठेवण्यात आला होता. तसेच शहरात दोन दंगा काबू पथकेही तैनात ठेवण्यात आली होती.विजय आमचाच होणार !कणकवली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी मतदान केल्यानंतर निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचे दावे प्रसिद्धी माध्यमांसमोर केले आहेत. यामध्ये संदेश पारकर, समीर नलावडे, राकेश राणे यांचा समावेश होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग