शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च दाब वीज वितरण प्रणालीसाठी 5000 कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:44 IST

गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे.

कणकवली : गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे. या मंडळासमोर अनेक आव्हाने आहेत. तरीही सन 2014 पासून आतापर्यंतच्या  कालावधीत वीज निर्मिती क्षमतेमध्ये 3300 मेगावॅटची वाढ झालेली आहे. तसेच राज्य भारनियमन मुक्त झालेले आहे. सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केली जात आहे. तसेच उच्च दाब विज वितरण प्रणाली (एचव्हीडीएस )यासाठी 5000 कोटींची गुंतवणूक शासन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे कोकण विभाग प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतरे , कोकण परिमंडळ मुख्यअभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील  अशोक शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी  विश्वास पाठक म्हणाले, राज्यात 25000 मेगावॅटपर्यंत विजेची मागणी पोहोचली आहे. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24012 मेगावॅट वीज पारेषित केली.सन 2014 मध्ये सु्मारे 35 लाख कृषिपंप धारक वीज ग्राहक होते. त्यात आता वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2014 पासून ऑगस्ट 2018 पर्यंत 4 लाख 34 हजार 304 कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कृषिपंपांना यापुढे उच्च दाब विज वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्यासाठी नवीन योजना मे 2018 मध्ये जाहिर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मार्च 2018 पर्यंत 2.5 लाख कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारणार असून उत्पादकता वाढेल. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे कृषि फीडर द्वारे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत विज पुरवठा करण्यात येणार आहे. राळेगण सिध्दी व कोळंबी याठिकाणी प्रकल्प सुरु झाले आहेत. अन्य ठिकाणीही प्रकल्प सुरु होणार आहेत.