शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरेतील भुयारी मार्गासाठी आज रात्री ४ तास ‘मेगा ब्लॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:20 IST

यंत्रणा सज्ज : २ मेपूर्वी भुयाराचे काम पूर्ण होणार; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बनवणार जोडरस्ते वैभववाडी : कोकिसरे येथील रेल्वे ...

यंत्रणा सज्ज : २ मेपूर्वी भुयाराचे काम पूर्ण होणार; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बनवणार जोडरस्तेवैभववाडी : कोकिसरे येथील रेल्वे फाटकाच्या पर्यायी भुयारी मार्गाच्या कामाने गती घेतली आहे. या भुयारी मार्गाच्या ठिकाणी तात्पुरता ट्रॅक बनविण्यासाठी गुरुवारी (दि. १७) रेल्वेमार्गावर चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यानंतर भुयारी मार्गाचा तयार ढाचा आणखी दोनदा मेगा ब्लॉक घेतला जाईल. ही संपूर्ण प्रकिया २ मेपूर्वी पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकाच्या त्रासातून २७ वर्षांनंतर सुटका होणार आहे. या रेल्वे फाटकालगतच भुयारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रेल्वे ट्रॅकच्या खाली बसविण्यासाठी आरसीसी ढाचा तयार करण्यात आला आहे. साडेआठ मीटर रुंद, साडेपाच मीटर उंच आणि ५३ मीटर लांबीच्या दोन मार्गिकांचा ढाचा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा ढाचा रेल्वे ट्रॅकखाली सरकविणे आणि त्या कालावधीत पर्यायी ट्रॅक तयार करणे अशा कामांचे नियोजन सध्या सुरू आहे. या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री दाखल झाली आहे.पहिल्यांदा पर्यायी ट्रॅक उभा करणे, त्यानंतर त्याखाली खोदाई करून आरसीसी ढाचा ट्रॅक खाली बसविणे आणि ट्रॅक पूर्ववत करणे अशा कामांसाठी १७ एप्रिल ते २ मे या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वा या वेळेत तीनदा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.दरम्यान, कोकण रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता राजीव पटगार यांनी कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत इतर अधिकारी होते. दरम्यान, ही सर्व कामे २ मेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.

भुयारी मार्ग व जोड रस्त्यासाठी ६४ लाखरेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी १६ कोटी ७६ लाख ५२ हजार ६१८ रुपये निधी मंजूर आहेत. याशिवाय भुयारी मार्गाच्या जोडरस्ता आणि इतर कामासाठी असा एकूण ६४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. २०२२ मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यावेळी कामाची मुदत १८ महिने होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून, मेमध्ये भुयारी मार्ग पूर्ण होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे