शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: राजकोट येथील शिवपुतळा उभारणीत थ्रीडी तंत्रज्ञान, सतीश देसाई यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:00 IST

जबाबदारी आणि आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणी कामात मालवणचे सुपुत्र आणि मुंबईतील डिझाइन थ्रीडी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सतीश शांताराम देसाई यांचे महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदान लाभले. शिल्पकार जयदीप आपटे यांनी घडविलेल्या शिवरायांच्या मूळ मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग व डिजिटल क्लोन करून भव्य पुतळा उभारणीसाठी आवश्यक थ्रीडी प्रिंटसाठी थ्रीडी फाइल तयार करण्याची जबाबदारी सतीश देसाई यांनी यशस्वीरीत्या पाडत या पुतळ्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरुवात ज्या भूमीतून झाली त्याच आपल्या मालवण या मायभूमीत नौदल दिनानिमित्त उभारलेल्या शिव पुतळ्याच्या निर्मितीत आपल्यालाही खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया सतीश देसाई यांनी दिली. शिव पुतळ्याचे अनावरणप्रसंगी मालवणात दाखल झालेल्या सतीश देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत या पुतळ्याच्या उभारणीतील आपल्या जबाबदारीविषयी माहिती दिली.राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची मूळ मूर्ती कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केली आहे. ही मूळ मूर्ती मातीची ६ फूट उंचीची आहे. या मातीच्या मूर्तीवरून फायबर ग्लासची मूर्ती बनविण्यात आली. या मूर्तीच्या आधारे महाराजांची २५ फुटी भव्य मूर्ती बनविण्यासाठी थ्रीडी स्कॅनिंग व डिजिटल क्लोन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असून या कामाची जबाबदारी नौदलाकडून आपल्या डिझाइन थ्रीडी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आली.

मूर्तीची उंची २५ फुटांपर्यंत वाढविलीमुख्य पुतळा निर्माण करण्यासाठी आवश्यक थ्रीडी फाइल बनवून देण्याचे काम आपण पूर्ण केल्याचे सतीश देसाई म्हणाले. हे काम आपल्याकडे आल्यावर जयदीप आपटे यांच्या मूर्तीशाळेत जाऊन मूळ ६ फुटी मूर्तीचे सर्व बाजूने थ्रीडी स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅनिंगच्या आधारे शिवरायांच्या मूर्तीची थ्रीडी इमेज संगणकात तयार करण्यात आली. त्यामध्ये मूर्तीमधील महाराजांचा जिरेटोप ते पायापर्यंतच्या भागातील अनेक बारकावे सुस्पष्ट करीत, स्कॅनिंगमध्ये स्कॅन न झालेले भाग भरून काढत तसेच इतर आवश्यक गोष्टी समाविष्ट करून मूर्तीची उंची २५ फूटपर्यंत वाढविण्यात आली.ब्रॉन्झ धातूमध्ये ६५० भाग ६५० भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तसेच या पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूची जाडी किती असेल याचेही माप या इमेजमध्ये तयार करण्यात आले. अशाप्रकारे शिवरायांच्या पुतळ्याच्या अंतिम स्वरूपाची थ्रीडी फाइल तयार करून थ्रीडी प्रिंटिंग करणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीकडे ही फाइल सोपविण्यात आली. या थ्रीडी फाइलचे मोठे प्रिंट काढून त्या आधारे पुतळ्याचे सुमारे ६५० भाग ब्रॉन्झ धातूमध्ये तयार करून ते मालवण राजकोट येथे पाठविण्यात आले. त्यानंतर राजकोट येथेच या भागाची वेल्डिंगद्वारे जोडणी करून व फिनिशिंग करून शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला, अशी माहिती सतीश देसाई यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड