शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जिल्ह्यातील ३९ गावे पूरबाधित

By admin | Updated: May 14, 2015 23:59 IST

प्रशासनाकडून निश्चिती : आपत्ती व्यवस्थापन निवारण विभाग सज्ज, नियंत्रण कक्ष स्थापन

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० नदी व खाडीलगतची तब्बल ३९ गावे ही पूरबाधित म्हणून प्रशासनाने निश्चित केली आहेत. या गावांमधील ३२८ कुटुंबे व ४३४७ लोकांना पावसाळ्यात पुराचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्यामुळे आगामी पावसाळी हंगामात या गावांना पुरापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच धोका निर्माण झाल्यास या गावांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विभाग सज्ज झाला आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी संपूर्ण बचाव साहित्य उपलब्ध असून आठही तालुक्यांमध्ये १ जून ते ३० आॅक्टोबर या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे. तेथे पावसाळी हंगामात सरासरी ३८०० ते ४३०० मि. मी. पर्यंत सरासरी पाऊस पडतो. ज्याठिकाणी पाऊस जास्त त्याठिकाणी आपत्तीही तेवढ्याच प्रमाणात असते. परिणामी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे दरवर्षी कोटीच्या घरात नुकसानी होत असते. तसेच नदी व खाडीलगतच्या गावांमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांची पडझड, घरातील अन्नधान्य भिजणे, शैक्षणिक साहित्याचे नुकसान होणे, पुरात माणसे वाहून जाणे यासारखे प्रकारही घडत असतात. म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने दरवर्षी सर्व्हे करून (माहिती घेऊन) पूरबाधीत गावांना अलर्ट केले जाते.यावर्षी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील १० नदी व खाडीलगतची तब्बल ३९ गावे ही पूरबाधित (पूरप्रवण) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. काही वर्षात त्याठिकाणी पूर येवून आपत्ती उद्भवल्याचा निकष लावून ही गावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच ‘त्या’ गावातील लोकांना दक्षतेच्या सूचनाही प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. संभाव्य पूरबाधित गावे१0 नदी खाड्यांमध्ये पुराचा धोकाजिल्ह्यात अतिवृष्टी झाली की प्रामुख्याने १० नदी व खाडीलगत असणाऱ्या गावांना पुराचा धोका संभवतो. या नदी व खाडीला पूर आला की त्याचे पाणी घरात शिरते. परिणामी काही ठिकाणी गावागावांमधील संपर्कदेखील तुटतो. या नद्यांमध्ये गडनदी, होडावडा नदी, कालवी नदी, तुळस नदी, शांती नदी, सुखनदी, गोठणा नदी, तेरेखोल खाडी, गडकालावल खाडी, विजयदुर्ग खाडी या नदी व खाड्यांपासून प्रामुख्याने लगतच्या काही गावांना पुराचा धोका संभवतो. प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पूरप्रवण क्षेत्रामध्ये ३२८ कुटुंबे येत आहेत. तसेच ४३४७ लोकांना पावसाळ्यात पुराचा फटका बसण्याची शक्यता असून त्याठिकाणी त्यांना प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. संबंधित कुटुंबांना पावसाळा कालावधीत दुसऱ्या ठिकाणी (पुराचा धोका नाही) राहण्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणारअद्ययावत व्यवस्थापन आराखडा करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व करावयाच्या सर्व कामांची सूचना संबंधित विभागांना देऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व त्यांचा समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावरून सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते. त्याचप्रमाणे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद या सर्व विभागांना आपत्कालीन कालावधीत घ्यावयाची खबरदारीबाबत मान्सूनपूर्व बैठकीत सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व विभाग आपत्ती कालावधीत व कालावधीपूर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.- ज्ञानेश्वर खुटवड, निवासी उपजिल्हाधिकारीआपत्ती उद्भवल्यास विभाग सज्जजिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली तरी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमीच दक्ष असतो. शोध व बचाव साहित्य सामुग्री पुरेशी असून नवनवीन साहित्य खरेदी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणे, जनजागृती यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी प्राप्त होत असून त्याचा योग्य विनियोग आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून होत आहे. त्यामुळे एखादी आपत्ती उद्भवली तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग त्याला तोंड देण्यास नेहमीच सक्षम असतो. त्यादृष्टीने यावर्षी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे.लोकमत विशेष