शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

होमहवनाच्या धुराने मधमाशांचा हल्ला, ३० जण जखमी; कणकवली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:09 IST

मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान होमहवन करताना घडली घटना

तळेरे : कणकवली तालुक्यातील ओटव व करूळ या दोन ठिकाणी रविवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे ३0 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली आहे.ओटव येथे धरण झाल्यानंतर त्यामध्ये बाधित झालेल्या श्री पावणादेवी मंदिराची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास होमहवन करताना समिधा, तूप सोडल्यावर तिथे मोठा धूर निर्माण झाला. त्यावेळी झालेल्या धुराची झळ बाजूला असणाऱ्या हेळ्याच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला लागली. यामुळे मधमाशा बिथरल्या. त्यांनी तिथे उपस्थित दोनशे ते अडीचशे नागरिकांवर हल्ला केला. यामुळे एकच पळापळ झाली. मात्र, वृद्ध व्यक्ती तसेच अन्य काहींना तेथून पळणे शक्य न झालेल्या सुमारे ३० जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यातील अनेकांचे तोंड, हात सुजले. जखमींपैकी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश आत्माराम ओटवकर (३४), हेमंत रामचंद्र ओटवकर (५२), गौरेश अभय ओटवकर (१७), संतोष मधुकर सावंत (३२, सर्व राहणार ओटव) यांनी उपचार घेतले. त्यांना आता घरी पाठविण्यात आले आहे. तर दोन खासगी रुग्णालयातही २६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.करूळ येथील तिघांवर मधमाशांचा हल्लाकरूळ कदमवाडी येथील आनंद कासले यांच्या घराच्या परिसरात ते रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसह साफसफाई करीत होते. पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीच्या धुरामुळे तेथील झाडावर असलेल्या मधमाशांनी त्यांच्यासह तिघांवर अचानक हल्ला केला.या घटनेत आनंद सदाशिव कासले (४२), पूर्वा आनंद कासले (३०), ऋणाली चिंतामणी कासले (२८, सर्व राहणार करूळ, कदमवाडी) हे जखमी झाले आहेत. त्या तिघांना तत्काळ उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठिक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग