शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला २५ कोटी : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:48 IST

महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत आहे.असे मत राज्याचे गृह, राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. सिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देमहिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला २५ कोटी : दीपक केसरकर पाडलोस रोणापाल रस्त्याचे भूमिपूजन

सावंतवाडी : महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत आहे.असे मत राज्याचे गृह, राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. सिंधुदुर्गच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.पाडलोस-भाकरवाडी-रोणापाल रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, उपसरपंच महादेव गावडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, सातार्डा उपविभागप्रमुख उल्हास परब, मळेवाड विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, पाडलोस ग्रामपंचायत सदस्य रामा नाईक, गणपत पराडकर, लीना माधव, रुचिता करमळकर, पाडलोस युवासेना शाखा अधिकारी समीर नाईक, सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते, माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, मळेवाड माजी उपसरपंच अर्जुन मुळीक, मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, दाजी राऊळ, श्रीधर परब, दिलीप गावडे, बाळा नाईक, राजन नाईक, विठ्ठल नाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, शेळीपालन, गाय-म्हैस दुध व्यवसाय, क्वॉयर काथ्या व्यवसायासाठी शंभर टक्के अनुदान देणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घ्या. शेतकरी सुखी व्हायला पाहिजे. नारळाच्या बागांमध्ये कशाप्रकारे उत्पन्न घ्यायचे यावर असणाऱ्या योजना सांगितल्या. तुमच्या प्रेमापोटीच महाराष्ट्राची जबाबदारी पेलत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. गावामध्ये समृद्धी आली पाहिजे, लोकांजवळ पैसे आले पाहिजे.

तुम्हाला जो व्यवसाय करायचा असेल त्याला सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार. पर्यटकांना घरात आणावयाचे असल्यास ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. बांदा येथे भव्य असे प्रवेशद्वार बांधणार आहे, असे केसरकर म्हणाले. रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितलेल्या सर्व रस्त्यांसाठी निधी दिला जाईल. राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच ठेवून नंतर पुन्हा एकत्र येणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले....तर मंत्रीपदाचे सार्थक होईल!ज्या ठिकाणी शांतता असते तेथे समृद्धी येते आणि जेथे समृद्धी येते तेथे लक्ष्मी येते. ज्या दिवशी ही समृद्धी तुमच्या घरामध्ये येईल त्यावेळी तुम्ही मला आमदार केल्याचे अन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री केल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे मला वाटेल, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग