शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कणकवलीतील विविध विकास कामांसाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

By सुधीर राणे | Updated: November 1, 2022 15:33 IST

लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील

कणकवली: महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणूनबुजून कणकवली नगरपंचायतला विकास कामांसाठी निधी न देता डावलले जात होते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने शहराच्या विकासासाठी २३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शहर विकासातील हे महत्वाचे पाऊल आहे. असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, किशोर राणे, महेश सावंत, राजू गावणकर आदी उपस्थित होते.यावेळी बंडू हर्णे म्हणाले, कणकवली शहराच्या  विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शहरातील रस्त्याकरिता ५ कोटी तसेच नागरी सुविधा योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे पाच कोटींचा निधीची यावेळी मागणी केली. नगरपंचायतचा मंजूर असलेल्या 'स्टाफ पॅटर्न' बाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निधीला मंजुरी देत तातडीने पुढील  निर्णय घेण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तसेच स्टाफ पॅटर्न बाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करा व  प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी द्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  राज्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांची देखील भेट घेत चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटन विकास दृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील २७ व २८ क्रमांकाचे आरक्षण विकसित करण्याकरिता अजून १० कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकूण २३ कोटी ३० लाखाची दिवाळी बंपर भेट कणकवली वासियांना मिळाल्याची माहिती समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी दिली. लवकरच रीतसर प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळेल व ही कामे मार्गी लागतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली