शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीतील एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून २० कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:46 IST

बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राहकाने बँकेवर दगडही फेकला. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शाखेत दाखल झालेल्या विभागीय व्यवस्थापकाने चार दिवसांत ग्राहकांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देवैभववाडीतील एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून २० कोटींचा गंडाफसवणूक झालेल्या काहींची बँकेत जाऊन धिंगाणा

वैभववाडी : बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राहकाने बँकेवर दगडही फेकला. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शाखेत दाखल झालेल्या विभागीय व्यवस्थापकाने चार दिवसांत ग्राहकांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.या कर्मचाऱ्याने नोटबंदी काळात अनेक बड्या उद्योगपतींना साथ देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्या कर्मचाऱ्याने अनेकांना गंडा घातला आहे. एका उद्योगपतीची तब्बल पावणेदोन कोटी रुपये रक्कम त्याने बँकेतून काढून खर्च केली आहे. तर एका मृत व्यक्तीच्या नावे बँकेत असलेली पंधरा लाखांची ठेव हडप केली आहे.

दुसºया एका कर्जदाराने काढलेल्या आठ लाख रकमेपैकी चार लाख रुपये खात्यातून काढल्याचा मेसेज आला. त्या खातेदाराने बँकेत चौकशी केली असता त्या कर्मचाऱ्याने या रकमेची मला गरज होती म्हणून मीच काढली अशी कबुली देत रक्कम दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले.दुसऱ्या दिवशी निम्मी रक्कम देत वितरणपत्रावर सही घेतली. अशाप्रकारे तीस ते चाळीस खातेदारांच्या खात्यावरील सुमारे २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढली गेल्याचा अदांज आहे. ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

ज्या खातेदारांची रक्कम खात्यावरून कमी झाली आहे ते खातेदार चार दिवसांपासून बँकेत फेऱ्या मारत आहेत. काहींनी वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला. त्यामुळे बँकेचे विभागीय व्यवस्थापक बँकेत येऊन चौकशी करीत आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सोमवारी बँकेत धडक दिली. व्यवस्थापकांशी त्यांनी हुज्जत घातली. इतकी रक्कम एकच कर्मचारी कसा काय काढू शकतो? याला बँक व्यवस्थापन जबाबदार आहे. आमचे पैसे द्या, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीBanking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग