शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:30 IST

कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. ३८ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी ही रक्कम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचितआतापर्यंत ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

ओरोस : कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. ३८ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी ही रक्कम आहे.परिणामी आतापर्यंत ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी ७ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेले १ हजार १८३ आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेले ७८२ असे एकूण १ हजार ९६५ शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत.आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश २७ डिसेंबर २०१९ रोजी काढण्यात आला. पहिली यादी २८ फेब्रुवारी २०२० रोजी काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत ११ हजार ३ शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन याद्यांत मिळून ९८२० शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. ११८३ नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसºया यादीत असतील असे शासनाने जाहीर केले होते.अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह २ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन घातले आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन प्रसिद्ध याद्यांमध्ये मिळून ९ हजार ८२० शेतकऱ्यांपैकी ९ हजार ५१ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. तर ७८२ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही.मात्र, यातील ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली आहे. तर यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ते या रकमेकडे डोळे लावून आहेत.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेची तिसरी यादी तीन महिन्यांपासून रखडलीमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील १ हजार १८३ लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांना खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही.

मार्च महिन्यात दुसरी यादी आली. मात्र, त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध ७८२ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. याच काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झालेतरी आधार केंद्रात जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रमाणीकरण रखडले. परिणामी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग