शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गकन्या १५ वर्षीय अंशिता करणार मुंबई टेबल टेनिस संघाचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:26 IST

पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

निकेत पावसकरतळेरे: कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील १५ वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे. पुणे येथे होणाऱ्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.मुळची कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील सहदेव गोपाळ ताम्हणकर यांची नात असलेली अंशिता मुंबई शहराची एक नंबरची खेळाडू असून तिने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून अंशिता टेबल टेनिस खेळत असून ती स्पिनॅर्ट अकॅडमी मधून आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश मुरेकर आणि चार्वी कावले यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ स्टार मुंबई शहर, जिल्हा नामाकंन टेबल टेनिस स्पर्धेमधील १९ वर्षाखालील प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव केल्यामुळे तीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.पुन्हा कर्णधार पदाची धुरा !यापूर्वी ८१ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने मुंबई संघाचे १२ वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधार म्हणुन प्रतिनिधित्व केले होते. यावेळी पुन्हा १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अंशिताची निवड झाली आहे.घरात फारसे खेळाचे वातावरण नसतानाही केवळ स्वत: च्या जिद्दीवर ती या खेळात यश संपादन करत आहे. ती प्रतिस्पर्धी कितीही वयाच्या खेळाडूसमोर खेळून प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यातील अनेक सामने विजयी झाली असल्याची प्रतिक्रीया तिचे वडिल अशोक ताम्हणकर यांनी दिली. सिंधुदुर्ग कन्या अंशिता ही प्रचंड मेहनती खेळाडू असून अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर विजय मिळवत आपली यशस्वी वाटचाल सुरु ठेवली आहे.पदकांची लयलूट!

  • यावर्षीच्या हंगामात अंशिता हिने पदकांची लयलूट केली. संपूर्ण मुंबईतील शाळांमध्ये १६ वर्षाखालील इंटरस्कूल स्पर्धेतील मुलींमध्ये रजत (ब्रॉंझ) पदक मिळविले. तर या हंगामात ५ सुवर्ण, २ कांस्य तर २ रजत असे एकूण ९ पदकांची लयलूट केली आहे.
  • पुणे येथे १९ ते २२ नोव्हेंबरला होणार्या ८४ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाची कर्णधार म्हणून खेळणार आहे. तर रत्नागिरी डेरवन येथे २ ते ५ डिसेंबर ला होणाऱ्या ज्युनियर चाम्पियनशिपसाठी तीची निवड झालेली आहे. या तिच्या वाटचालीत तिचे प्रशिक्षक परेश मुरेकर आणि चार्वी कावले, आई वडिल अशोक ताम्हणकर आणि आरती ताम्हणकर यांचा मोठा सहभाग आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग