शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:54 IST

सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे : जयंत जावडेकर

मालवण : सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थिनींनी गट करून घरीच राहून राख्या बनवून भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी राख्या पाठविल्या.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोना योद्धा म्हणून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सुचिता केळुसकर हिच्या हस्ते प्रतीकात्मक राखी बांधण्यात आली. या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांनी नियोजन करीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्यावर म्हणजेच १०,१०३ राख्या बनविण्यात आल्या. यासाठी संस्थाध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही. जी. खोत तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, सचिव साबाजी करलकर व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र, आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभ संदेशही राख्यांसोबत सैनिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती पवन बांदेकर यांनी दिली. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, देवेंद्र चव्हाण, गुरुदास दळवी, प्रभुदास आजगांवकर, सुनंदा वाईरकर, शिल्पा प्रभू व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.देशसेवेतून कृतज्ञता व्यक्तयावेळी जयंत जावडेकर म्हणाले, राख्या पाठविण्याच्या उपक्रमातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थिनींनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देश ही केवळ भौगोलिक सीमा नसून देशातील लोकांच्या कार्यातून देश निर्माण होत असतो. म्हणूनच आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे.विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लडाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही, कोची नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लडाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनcollegeमहाविद्यालयsindhudurgसिंधुदुर्ग