शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 17:09 IST

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते.

(Image Credit : Healthline)

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते. गर्भनिरोधक गोळ्या घेणे असो वा नसबंदी करायची असो या कामांसाठी महिलांना पुढे केलं जातं. भारतात हे नेहमीच पाहिलं जातं की, पुरुष हे नसबंदी करण्याऐवजी कंडोमचा वापर करतात आणि नसबंदीपासून पळतात. 

त्यामुळेच भारतात नसबंदी करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण फार कमी बघायला मिळतं. नसबंदी करण्याबाबत पुरुषांमध्ये अनेक शंका-कुशंका असतात. सर्वात मोठी भीती म्हणजे अनेक पुरुषांना असं वाटतं की, नसबंदी केल्याने त्यांच्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या क्षमतेत कमतरता येते किंवा त्यांचा त्यातील रस कमी होतो. तसेच नसबंदी केल्याने खूप वेदना होतात, असाही समज असतो. पण हे सत्य नाही. नसबंदी केल्याने पुरुषांना अजिबात वेदना होत नाहीत. अॅनेस्थेशिया देतेवेळी इंजेक्शनचा जो त्रास होतो तितकाच याचा त्रास होतो. 

नसबंदी केली तरी शुक्राणू तयार होतातच

नसबंदीमध्ये शुक्राणू वाहिनी नलिका बांधली जाते. ज्यामुळे शुक्राणू बाहेर न येतात शरीरातच राहतात. अमेरिकेतील संशोधकांचं म्हणनं आहे की, नसबंदी केलेल्या व्यक्तींचं आरोग्य हे नसबंदी न केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक चांगलं राहतं. 

लैंगिक क्षमता कायम राहते

अनेकांना वाटणारी ही सर्वात मोठी भीती आहे. पण नसबंदी केल्यानंतर शारीरिक संबंधातील रस कमी होणे, लगेच स्खलन होणे अशा समस्य होत नाही. या भावना आहे तशाच राहतात. फक्त नसबंदी केल्यावर काही दिवसच प्रायव्हेट पार्टमध्ये हलकी वेदना होते. तज्ज्ञांनुसार, नसबंदी केल्यावर कोणत्याही प्रकारची नपुसंकता येत नाही, उलट याने शीघ्रपतनाची समस्या दूर होते. तसेच नको असलेल्या गर्भाची चिंता दूर होते आणि यामुळे शारीरिक संबंधाचा आधीपेक्षा अधिक आनंद मिळवता येऊ शकतो.

गर्भप्रतिबंधक शस्त्रक्रियेमुळे सेक्सवर परिणाम होतो का?

गर्भप्रतिबंधक शस्त्रक्रियेमुळे गर्भधारणा होण्याचे थांबते. कारण शुक्राणूंचा अंडाशयापर्यंत जाण्याचा मार्ग बंद झालेला असतो. लैंगिक क्रियेवर याचा काहीही परिणाम होत नाही. ती पूर्वीइतकीच कार्यक्षम असते. कामवासनेचा उगम मेंदूच्या तळाशी असलेल्या कामप्रेरक केंद्रातून होतो. स्पर्श, दृश्य, सुगंध आणि कामुक विचार यामुळे हे केंद्र प्रेरित होत. आणि यापैकी कोणत्याही गोष्टीला शस्त्रक्रियेमुळे धक्का पोहोचत नाही. त्याचबरोबर शरीरातील ज्या हामोर्न्समुळे कामेच्छा नियंत्रित केली जाते, त्या त्या हामोर्न्सवरही शस्त्रक्रियेचा काही परिणाम होत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यrelationshipरिलेशनशिप