लैंगिक जीवन : खरंच ठराविक दिवस आणि वेळेला असतं का महत्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:43 PM2019-08-22T15:43:55+5:302019-08-22T15:44:12+5:30

कधी तुम्हाला असा प्रश्न पडला का की, शारीरिक संबंधासाठी आठवड्यातील कोणता दिवस किंवा कोणती वेळ सर्वात बेस्ट आहे?

Survey says this is the best day and time to have sex | लैंगिक जीवन : खरंच ठराविक दिवस आणि वेळेला असतं का महत्व?

लैंगिक जीवन : खरंच ठराविक दिवस आणि वेळेला असतं का महत्व?

googlenewsNext

तशी तर शारीरिक संबंध ठेवण्याची अशी खास नेमलेली वेळ नसते. जेव्हा तुम्हाला शारीरिक संबंधाची इच्छा होईल आणि यासाठी पार्टनरची सहमती असेल तर तुम्ही पुढाकार घेऊ शकता. पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला का की, शारीरिक संबंधासाठी आठवड्यातील कोणता दिवस किंवा कोणती वेळ सर्वात बेस्ट आहे? जर असा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर एका रिसर्चमधून समोर आलं आहे. पण याआधी झालेल्या वेगवेगळ्या रिसर्चमधून अशा निष्कर्षांना नाकारण्यात आलं आहे.

कोणता दिवस बेस्ट?

ब्रिटनच्या एका ब्युटी रिटेलर सुपरड्रग्सनने साधारण २ हजार लोकांवर एक सर्व्हे केला. या सर्व्हेतून समोर आले की, सर्व्हेतील जास्तीत जास्त सहभागी लोक रविवारी सकाळी ९ वाजता शारीरिक संबंध ठेवणं पसंत करतात. तर शारीरिक संबंधासाठी दुसऱ्या क्रमांकावर शनिवार या दिवसाला लोकांची अधिक पसंती होती. 

मनमुराद आनंद घ्या

अर्थातच जर वीकेंड आहे आणि सुट्टीचा दिवस आहे. सोबतच डोकं स्ट्रेस फ्रि आहे तर पार्टनरसोबत इंटिमेट होण्याची ही बेस्ट वेळ ठरू शकते. असं असलं तरी तज्ज्ञ सांगतात की, तुम्ही कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी शारीरिक संबंध ठेवता याने काहीही फरक पडत नाही. हा आजूबाजूची परिस्थिती, मूड या गोष्टींसह प्रत्येकाची वैयक्तीक बाब आहे. महत्त्वाचं हे आहे की, शारीरिक संबंध दोन्ही पार्टनर सहमतीने आणि त्यांना आनंद देणारा असावा. अशात शारीरिक संबंधाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर काही गोष्टींची तुम्ही काळजी घेऊ शकता. 

फोरप्लेकडे करू नका दुर्लक्ष

जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा खासकरून पुरूष थेट इंटरकोर्सचा विचार करू लागतात. खरा खेळ सुरू होण्यापूर्वी फोरप्लेला वेळ दिला तर दोघांनाही ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. त्यामुळे फोरप्लेकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. 

कंडोम आणि लुब्रिकन्टचा वापर

शारीरिक संबंधादरम्यान प्रोटेक्शनचा वापर करणे सर्वात गरजेचं आहे. मुद्दा केवळ नको असलेल्या गर्भाचा नाहीये तर वेगवेगळ्या लैंगिक आजारांचाही आहे. त्यामुळे कंडोमशिवाय शारीरिक संबंध ठेवू नका. तसेच लुब्रिकन्टचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. कारण अनेकदा नैसर्गिक ओलावा कमी असल्याने दोघांनाही त्रासाचा सामना करावा लागू शकतो. 

Web Title: Survey says this is the best day and time to have sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.