शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : संबंधानंतरही संतुष्टी न मिळाल्यास काय होतो महिलांवर प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 15:59 IST

काही लोकांना प्रश्न पडतो की, पार्टनर संतुष्ट नाही हे कसं ओळखावं किंवा जाणून घ्यावं. यावर थेट बोलावं कसं असाही अनेकांना प्रश्न पडतो.

काही लोकांना प्रश्न पडतो की, पार्टनर संतुष्ट नाही हे कसं ओळखावं किंवा जाणून घ्यावं. यावर थेट बोलावं कसं असाही अनेकांना प्रश्न पडतो. पण मुळात पार्टनर संतुष्ट आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी त्यावर बोलणं हा एकच मार्ग नाही. अर्थात बोलून सुद्धा जाणून घेता येऊ शकतं. पण जर त्यावर बोलता येत नसेल तर आणखीही काही संकेत आहेत ज्यावरून तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. आणि त्यानुसार समस्या दूर करण्यावर काम करू शकता.

मानसिक आणि भावनात्मक गरज

शारीरिक संबंधाने व्यक्तीची केवळ शारीरिकच नाही तर भावनिक गरजही पूर्ण होत असते. सामान्यपणे ही समस्या महिलांसोबत अधिक होते. त्यात ही समस्या पार्टनरकडे बोलून कशी दाखवायची ही सुद्धा अडचण असते. अशावेळी पुरूष जोडीदाराची योग्य माहिती घेणं ही जबाबदारी असते.

काय असतो फरक?

सेक्शुअल लाइफमध्ये सगळं चांगलं असणं किंवा नसणं या दोन्ही स्थितींचा प्रभाव पार्टनर्सच्या बॉंडिंगवर पडतो. सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांबाबत सांगायचं तर त्यांना तणाव, चिंता, डिप्रेशन, लठ्ठपणा आणि थायरॉइड सारख्या समस्या होऊ शकतात. जर महिलांना अशाप्रकारच्या समस्या झाल्या तर त्यांना पुढे गर्भधारणेतही समस्या निर्माण होऊ शकते.

वेदना अधिक होतात

तज्ज्ञ सांगतात की, असं जर असेल की, महिला सेक्शुअल अ‍ॅक्टनंतरही संतुष्ट होत नसतील तर त्यांना दुसऱ्यांदा संबंध ठेवताना वेदना अधिक जाणवू शकतात. वेगवेगळ्या केसेसमध्ये याची शारीरिक आणि मानसिक वेगवेगळी कारणे असू शकतात.

उत्तेजना होते कमी

ज्या महिलांना संतुष्टी जाणवत नसेल त्यांना फोरप्ले दरम्यान उत्तेजनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा महिलांमध्ये शारीरिक संबंधाबाबत इच्छा कमी झालेली बघायला मिळते किंवा पूर्णपणे इच्छा नष्ट झालेली बघायला मिळते. अशात त्यांच्या पार्टनरला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

पार्टनरची साथ नसणं

ज्या महिलांना शारीरिक संबंधानंतरही संतुष्टीची जाणीव होत नाही, त्या दुसऱ्यांना पार्टनरसोबत शारीरिक संबंध एन्जॉय करू शकत नाहीत. आणि पुरूष पार्टनर ही बाब लगेच समजू शकतात. अशात वेळीच संवादाने किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर उपाय केला जाऊ शकतो.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप