सामान्यपणे जेव्हा सुरक्षित शारीरिक संबंधाचा विषय येतो तेव्हा सर्वांच्या डोक्यात केवळ कंडोमचं नाव येतं. कंडोमचा वापर गर्भधारणा, लैंगिक रोगांपासून बचावासाठी आणि सुरक्षित शारीरिक संबंधासाठी केला जातो. पण कधी तुम्ही डेंटल डॅमबाबत ऐकलंय का? हाही एक कंडोमचाच प्रकार आहे. म्हणजे ओरल सेक्स करताना डेंटल डॅम(तोंडाचा कंडोम) चा वापर केला जातो. अंतर केवळ इतकं असतं की, कंडोमचा वापर पुरुषांच्या गुप्तांगावर केला जातो तर डेंटल डॅमचा वापर ओरल सेक्सदरम्यान केला जातो.
डेंटल डॅम हा लेटेक्स किंवा पॉलीयुरेथेन (polyurethane) सारख्या स्ट्रेच मटेरिअलपासून तयार केलेला हा कंडोम सुद्धा कंडोम सुरक्षित लैंगिक संबंधासाठी वापरला जातो. ओरल सेक्सदरम्यान योनी, लिंगाच्या आजूबाजूला तोंड, ओठ आणि जिभेचा वापर केला जातो. ज्यामुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका असतो. या समस्येपासून बचावासाठीच डेंटल डॅमचा वापर केला जातो.
डेंटल डॅम वेगवेगळ्या रंगात आणि सामान्यपणे चौकोणी आकाराचा असतो. हे सुद्धा कंडोमप्रमाणे सुगंधित आणि असुगंधित दोन्ही फ्लेवरमध्ये मिळतात. यावर कोणत्याही प्रकारचा चिकट पदार्थ न लावता याचा वापर केला जाऊ शकतो.
कसा करावा वापर?
डेंटल डॅम पॅकेटमधून सहजपणे बाहेर काढा. पार्टनरच्या गुप्तांगावर ठेवा. तोंडाचा आणि गुप्तांचा थेट संपर्क येऊ नये अशाप्रकारे ठेवा. अनेकदा गुप्तांगातील ओलाव्यामुळे डेंटल डॅम योग्यप्रकारे फिट बसतो. सामान्यपणे शीअर ग्लाइड डॅम ब्रॅन्डचा डेंटल डॅम अधिक सुरक्षित मानला जातो. पण इतरही डेंटल डॅम लाभदायक आहेत. मात्र डेंटल डॅमचा वापर करण्याआधी एकदा तो लेटेक्सपासून तयार केलेला आहे की नाही हे चेक करा.