Men sex life can be ruined due to depression | 'या' एका गोष्टीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं पुरूषांचं लैंगिक जीवन!
'या' एका गोष्टीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं पुरूषांचं लैंगिक जीवन!

लैंगिक जीवन हे वेगवेगळ्या कारणांनी उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे डिप्रेशन हे आहे. डिप्रेशनचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे तुम्ही वाचलं असेलच. सामान्यपणे डिप्रेशन ही समस्या तशी मेंदूशी निगडीत समस्या मानली जाते. पण याचा प्रभाव संपूर्ण शरीराच्या गुणवत्तेवरही पडतो.

बदलती जीवनशैली आणि सामाजिक जीवनाच्या कमतरतेमुळे आजकाल डिप्रेशन ही सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. डिप्रेशनमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर काही लोक आत्महत्येसारखं पाऊलही उचलतात. एका रिसर्चनुसार, डिप्रेशनमुळे पुरूषांच्या लैंगिक जीवनावर खोलवर वाईट परिणाम होतो. ही इतकी गंभीर समस्या आहे की, याने बाळ जन्माला घालण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. 

काय सांगतो रिसर्च?

या रिसर्चनुसार, दोन महिन्यांपेक्षा अधिक जर एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये राहत असेल तर त्याच्या स्पर्मची गुणवत्ता फार कमजोर होते. कोणत्याही पुरूष किंवा महिलेचं लैंगिक जीवन हे स्पर्ममुळेच असतं, जर स्पर्म कमजोर झाले तर याचा प्रभाव लैंगिक जीवनावरही पडू शकतो.

११०० लोकांवर रिसर्च

या रिसर्चमध्ये ११०० पुरूषांच्या स्पर्मचं परिक्षण करण्यात आलं. रिसर्चमध्ये दोन प्रकारच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यात डिप्रेशन किंवा कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नसलेले आणि काही डिप्रेशनची समस्या असलेल्या लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. 

अभ्यासकांनी दोन्ही गटातील लोकांच्या स्पर्मचा तुलनात्मक अभ्यास केला. तसेच अभ्यासाकांनी हेही तपासलं की, डिप्रेशन किती काळ असल्याने स्पर्मवर काय परिणाम झाला. यातून अभ्यासकांना असं आढळलं की, डिप्रेशनचा प्रभाव स्पर्मवर पडतो आहे. स्पर्मची गुणवत्ता कमजोर होत असल्याने लैंगिक जीवन आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासोबतच बाळाला जन्म देण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पडत आहे.

या रिसर्चचं प्रकाशन हेल्थ जर्नल मेडिसिन नेटवर्कमध्ये करण्यात आलं आहे. रिसर्चनुसार, केवळ दोन महिन्याच्या डिप्रेशन किंवा स्ट्रेसमुळे पुरूषांच्या स्पर्ममध्ये कमजोरी येत आहे. या रिसर्चनुसार, डिप्रेशनमुळे पुरूषाचे स्पर्म कमजोर होतात आणि त्यांचं लैंगिक जीवनही अडचणीत येतं.


Web Title: Men sex life can be ruined due to depression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.