लग्नाच्या काही वर्षांनी अनेकजण कामेच्छा कमी झाल्याची किंवा कमजोरीची तक्रार करतात. कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, न्यूनगंड, वैयक्तिक वाद अशा वेगवेगळ्या कारणांनी तर पुरूषांची कामेच्छा कमी होतेच, पण यातील सर्वात महत्त्वाच कारण आहे योग्य आहार न घेणं. मग अनेकांवर स्टॅमिना वाढण्याचं औषध घेण्याची वेळ येते. पण या औषधांचा सगळ्यांना फायदा होतोच असे नाही. शिवाय यांच्या अधिक वापराने नुकसानही होतं. त्यापेक्षा नैसर्गिक उपायांनी सुद्धा कामेच्छा वाढवता येऊ शकते. कशी ते जाणून घेऊ.
बिटाचा रस
बिटात इतर भाज्यांच्या तुलनेत २० पटीने जास्त नाइट्रेट असतं. तसेच बीट हे बोरॉन मिनरल्सचा देखील मोठा स्त्रोत आहे. बोरॉनमुळे सेक्स हार्मोन्सची निर्मिती करण्यास मदत मिळते. रोज बिटाचा रस प्यायल्याने ब्लड फ्लो सुद्धा सुधारतो, ज्याने तुमचा स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते.
दूध
हेल्दी लैंगिक जीवनासाठी दूध पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. यातील फॅट शरीर अॅक्टिव करतात, जेणेकरून फॅट बर्न होतील. याने ब्लड फ्लो सुद्धा सकारात्मक पद्धतीने होतो. ज्यामुळे शारीरिक संबंधावेळी तुमचा स्टॅमिना कायम ठेवण्यासाठी फायदेशीर राहतो.
डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस देखील रक्ताच्या प्रवाहावर प्रभाव टाकतो. डाळिंबाच्या रसाने ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत मिळते. तसेच याने इरेक्शनसंबंधी समस्या दूर करण्यासही मदत मिळते. त्यामुळे तुम्ही आणखी चांगल्याप्रकारे शारीरिक संबंधा एन्जॉय करू शकाल.
ऐवकाडोचा रस
ऐवकाडोमध्ये अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात. यात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याने तुमचा एकूणच स्टॅमिना वाढवण्यास मदत मिळते.
अॅलोव्हेरा ज्यूस
अॅलोव्हेरा ज्यूस हा प्रत्येकालाच सूट करतो असं नाही. पण हा ज्यूस शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. पण हा ज्यूस सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
बनाना शेक
बनाना शेक सेक्शुअल हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यात तुम्ही मध सुद्धा टाकू शकतो. याने फायदा अधिक होईल.